पेंग्विन मृत्युची चौकशी झाल्याशिवाय पेंग्विन दर्शन नकोच - नितेश राणे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 January 2017

पेंग्विन मृत्युची चौकशी झाल्याशिवाय पेंग्विन दर्शन नकोच - नितेश राणे

मुंबई / प्रतिनिधी - मुंबईच्या राणीबाग़ येथे 25-26 जानेवारी पासून पेंग्विन दर्शन होईल असे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यानी जाहिर केले आहे. मात्र कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेवुन मृत पेंग्विनचा अहवाल जाहिर करण्याची मागणी केली आहे. पालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांच्या सोबत राणे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राणे बोलत होते.
राणीबाग येथे हम्बोल्ड जातीचे पेंग्विन आणण्यात आले आहेत. त्या पैकी एक पेंग्विन एका महिन्यातच मृत झाला आहे. एका पेंग्विनचा मृत्यु झाल्या नंतर कॉंग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी लोकायुक्तांकड़े तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर पालिकेला लोकायुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार 15 दिवसात चौकशी करून अहवाल सादर केला जाणार होता. परंतू 150 दिवस झाले तरी अद्याप अहवाल सादर केला जात नसल्याने कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. मृत पेंग्विनचा अहवाल सादर केला नाही, कंत्राटदारावर कारवाई झाली नाही तर आम्ही पेंग्विन दर्शन होऊ देणार नाही. राणीबाग़ मध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी पालिका आयुक्तांची असेल असा इशारा राणे यांनी दिला आहे.

मातोश्री पर्यंतच्या हितसंबंधांचा पर्दाफाशहायवे कंपनीकडे कोणत्याही प्रकारचे प्राणी सांभाळण्याचा अनुभव आणि अधिकार नसताना या कंपनीला कंत्राट दिलेच कसे, असा सवाल करत राणे यांनी यामागील असलेल्या मातोश्रीपर्यंतच्या हितसंबंधाचा पर्दाफाश केला. ज्या कंपनीला कंत्राट देण्यात आले त्या कंपनीचा प्रमुख तन्मय रॉय आणि आणि सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या सोबत असलेला फोटोही माध्यमासमोर दाखवून या कंत्राटामागील दडलेले हितसंबंध माध्यमापुढे दाखवून दिले. खोटे कागदपत्रे दिलेले असताना या तन्मय रॉयला पुन्हा कंत्राटे का दिली जातात, ते काय प्रशासनाचे जावई आहेत काय, असा सवालही राणे यांनी केला.

कंत्राटात अनुभवी संस्थेला का नाकारले?बर्ड पार्कसाठी रॉय यांच्या युनिर्व्हर्सल आॅर्गनिक कंपनीकडे प्राणी सांभाळण्याचा कोणताही अनुभव नसताना त्यांना हे कंत्राट देण्यात आले होते, जेव्हा की, अनुभव असलेल्या कंपन्यांना यासाठी नाकारण्यात आल्याने त्या कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली असल्याची माहितीही राणे यांनी दिली. तसेच ज्या पेंग्विनच्या प्रदर्शनासाठी शुल्क ठेवण्यात आलेले आहे, ते महापालिकेला नसून सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटीला आहेत, अशा वेळी शुल्क ठरवून प्रशासन कायदे आणि त्यासाठीचे नियम धाब्यावर बसवत असल्याचेही नितेश राणे म्हणाले.

Post Bottom Ad