शिवसेनेचा वचननामा - मालमत्ता कर नाही, मोफत आरोग्य सुविधा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवसेनेचा वचननामा - मालमत्ता कर नाही, मोफत आरोग्य सुविधा

Share This
मुंबई, दि. 19 Jan 2017 - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिरनाम्याची रुपरेषा थोडक्यात मांडली आहे. मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर आकारला जाणारा नाही. तर 500-700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्यात येणार आहे. तसेच, मुंबईकरांना मोफत आरोग्य सुविधा मिळाणार आहे. यासाठी, प्रमुख बाळासाहेब आरोग्य कवच योजना राबवण्यात येईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईकर हा फक्त कर भरण्यासाठीच आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. मुंबईकर आणि शिवसेनेचे नाते घट्ट आहे. त्यामुळे मुंबईकरांना त्रास होऊ देणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीपूर्वी दिली. येत्या पाच वर्षात मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या अनेक मुद्द्यांना शिवसेनेने या निमित्ताने हात घातला आहे.

पत्रकार परिषदेतील मुद्दे -
- अखिलेश यादव यांचे कौतुक, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात चांगले काम सुरू आहे.
- 1 तारखेला अर्थसंकल्प सादर होत आहे, आमच्या मागण्यांचे एक पत्र आम्ही केंद्राला पाठवले आहे.
- लवकरच आमचा जाहिरनामा प्रकाशित होईल
- #didyouknow नावाने आम्ही कॅम्पेन सुरू केली आहे. यात आम्ही केलेली कामे लोकांना सांगतोय
- सध्या कधी कुणाचा खिसा कापला जाईल हे समजत नाही. 
- मुंबईत 500 फुटापर्यंत ज्याची घरे त्यांना मालमत्ता कर माफ करणार.
- 700 फुटापर्यंत ज्यांची घरे त्यांना करात सवलत देणार
- पुढील पाच वर्षात या गोष्टी करणार
- मुंबईकरांचा घराचा आणि आरोग्याचा प्रश्न मोठा आहे.
- पालिका अद्ययावत आरोग्य सेवा पुरवत आहे.
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच नावाखाली मोफत आरोग्य सेवा

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages