आमच्याच भूमिका सेनेने पुन्हा मांडल्या - आशिष शेलार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 January 2017

आमच्याच भूमिका सेनेने पुन्हा मांडल्या - आशिष शेलार

मुंबई 19 Jan 2017 - भाजप शिवसेना युतीच्या चर्चेच्या बोलणी सुरू असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना आमच्याच भूमिका सेनेने पुन्हा मांडल्या असल्याचा पलटवार मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या घोषणेत काहीही नाविन्य नाही. भाजपने जी भूमिका विधानसभेत घेतली होती त्याचाच हा सर असल्याचे शेलार यांनी सांगितले. विधानसभेतच ६०० स्क्वेअर फुटाच्या घरांना मालमत्ता कर लावू नये, अशी भूमिका मी स्वतः मांडल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ३४ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात ५७ हजार कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत असलेल्या या महापालिकेत टॅक्स टेरेरिजम सुरु असल्याचा आरोप करत, आता यापुढे हे चालणार नाही असे शेलार यांनी बजावले आहे. आमचा जाहीरनामा तयार आहे लवकरच त्याची घोषणा होईल. त्या जाहीरनाम्यात रोड टॅक्स नसेल हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. मात्र काही लोकांना आता त्याची उपरती झाल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Post Bottom Ad