मुंबई मॅराथॉनच्या आयोजकांना महापालिकेची नोटिस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई मॅराथॉनच्या आयोजकांना महापालिकेची नोटिस

Share This
२४ तासात ५ कोटी ४८ लाख रुपये भरण्याचे आदेश -
रक्कम न भरल्यास विद्रुपकरणांतर्गत खटला दाखल करणार ! -
मुंबई / प्रतिनिधी - 
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात रविवार दि. १५ जानेवारी २०१७ रोजी 'स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅराथॉन २०१७' आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. या मॅराथॉनच्या मार्गावर संबंधित आयोजकांद्वारे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात अनेक जाहिरात फलक लावण्यासह लेजर शो देखील आयोजित केला जाणार आहे. यानुसार जाहिरात शुल्क, भू - वापर शुल्क आणि सुरक्षा ठेव याकरिता रुपये ५ कोटी ४८ लाख ३० हजार ६४३ एवढी रक्कम महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. सदर रक्कम भरण्याबाबतचे पत्र महापालिकेच्या अनुज्ञापन अधिक्षक यांच्याद्वारे यापूर्वीच देण्यात आले होते.

मात्र संबंधित आयोजकांनी सदर रक्कम न भरल्याने पुढील २४ तासात सदर रक्कम महापालिकेकडे भरण्याची नोटिस मॅराथॉन चे आयोजक / संयोजक 'मे. प्रोकॅम इंटरनॅशनल लि.' यांना महापालिकेच्या 'ए' विभागाद्वारे देण्यात आली आहे. सदर रक्कम न भरल्यास संबंधित आयोजकांवर विद्रुपीकरणाबाबत तसेच अनधिकृतपणे जाहिरात फलक व तत्सम बाबी करण्याबाबत संबंधित अधिनियमातील (Maharashtra Defacement of Properties Act / MMC Act) तरतूदींनुसार खटला दाखल केला जाईल, अशी माहिती महापालिकेच्या 'ए' विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

दरम्यान आम्ही गेले 13 वर्षे मुंबईत मॅराथॉन आयोजित करत आहोत. मुंबई महापालिकाही यात सहभागी आहे. याबाबत आम्ही पालिका अधिकाऱ्यांशी सपर्क साधून यामधून मार्ग काढू असे मॅराथॉनचे आयोजक प्रोकॅम इंटरनॅशनलच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages