रिपब्लिकन म्हणजे प्रजेच्या हाती सत्ता देणारा पक्ष --- रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 January 2017

रिपब्लिकन म्हणजे प्रजेच्या हाती सत्ता देणारा पक्ष --- रामदास आठवले

मुंबई दि 12 Jan 2017 - छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ स्वाभिमानाची समतेची आणि परिवर्तनाची लोककल्याणाची होती तोच वारसा रिपब्लिकन चळवळीला मिळाला आहे असे सांगत रिपब्लिकन म्हणजे प्रजेच्या हाती सत्ता देणारा पक्ष आहे आगामी निवडणुकांत रिपाइंची ताकद दाखवा आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा पाडाव करा असे आवाहान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले

रवींद्र नाट्यमंदिर येथे रिपाइंच्या महिला आघाडीतर्फे राजमाता जिजाऊ आणि क्रान्तिज्योत सावित्रीमाई फुले यांचा जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता त्यावेळी झालेल्या सभेत नामदार आठवले बोलत होते यावेळी विचारमंचावर रिपाइंच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सीमाताई आठवले कुमार जित आठवले रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर माजी आमदार सुमंतराव गायकवाड महिला आघाडी च्या राष्ट्रीय सचिव सौ शिलाताई गांगुर्डे महाराष्ट्र अध्यक्ष आशाताई लांडगे मुंबई अध्यक्ष अभयताई सोनावणे शैलजा गिरकर उल्हासनगर च्या उपमहापौर पंचशीला पवार चंद्रकांता सोनकांबळे गीता कपूर नैनाताई खराटे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते

राजमाता जिजाऊंचा माता सावित्रीमाई फुलेंचा महिलांनी आदर्श घ्यावा महिला सुशिक्षित झाली तर सर्व कुटुंब सुशिक्षित होईल त्यामुळे महिलांनी शिक्षण घ्यावे आता मागासवर्गीय स्त्रियांमध्ये प्रगती झालेली दिसते महिलांनी उद्योग क्षेत्रात पुढे यावे तसेच सामाजिक क्षेत्रात एनजीओ स्थापन कराव्यात सामाजिक न्याय मंत्रालय तर्फे महिलांनी सामाजिक योजनांद्वारे प्रकल्प राबवावेत कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी महिलांनी पुढे यावे असे आवाहन नामदार रामदास आठवले यांनी केले

नरेंद्र मोदी हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची अर्थनीती मानणारे प्रधानमंत्री आहेत असे गौरवोद्गार आठवलेंनी काढले गोवा विधानसभेत रिपाइं उमेदवार उभे न करता भाजपाला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा नामदार रामदास आठवले यांनी केली तसेच आगामी पंजाब उत्तर प्रदेश उत्तराखंड मणिपूर येथील विधानसभा रिपाइं ताकदीने लढणार आहे असे ते म्हणाले

यावेळी रिपाइं मध्ये युवती आघाडी ची स्थापना करण्यात आली तसेच नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते दलित पँथर पासून रिपब्लिकन पक्षात कार्य केलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला
यावेळी मराठा आघाडीचे हेमंत सावंत महेंद्र शिर्के तसेच सौ शिलाताई गांगुर्डे आणि अनिल गांगुर्डे सिद्धार्थ कासारे बाळासाहेब गरुड सोना कांबळे सौ जयश्रीताई कांबळे प्रकाश जाधव सौ शशिकला आणि मनोहर जाधव सौ आणि श्री बशीर यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश बार्शीन्ग गौतम सोनावणे अनिलभाई गांगुर्डे चंद्रशेखर कांबळे संदेश उमप रमेश गायकवाड सचिनभाई मोहिते विजय साबळे महावीर सोनावणे सूत्रसंचालन नंदाताई कांबळे स्नेहाताई भालेराव माधुरिताई कांबळे वैशाली जगताप गीताबेन सोलंकी स्वप्नाली जाधव सोनम शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते

Post Bottom Ad