शिक्षकांच्या साक्षीने भरला रामनाथ मोते यांनी उमेदवारी अर्ज भरला. - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 January 2017

शिक्षकांच्या साक्षीने भरला रामनाथ मोते यांनी उमेदवारी अर्ज भरला.

मुंबई (प्रतिनिधी) 16 Jan 2017 - शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून राज्यभरात ओळख असलेल्या व कोकण विभागीय शिक्षक मतदार संघातून सलग दोन वेळा विधानपरिषदेवर गेलेले शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सोमवारी कोकणसह राज्यभरातून आलेल्या शिक्षकांच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज भरला. मोते यांना पाठिंबा देण्यासाठी कोकणातील पालघर, ठाणे, रायगड,रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून शेकडो शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने कोकण भवन, नवी मुंबई येथे दाखल झाले होते.

कोकण शिक्षक मतदार संघातून आपला अर्ज भरल्यानंतर मोते यांनी आपली लढाई ही शिक्षकांच्या आणि राज्यातील अनुदानित, सरकारी शाळांच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे सांगितले. शिक्षकांसाठी मागील ४० वर्षांपासून आपण शिक्षकांसाठी वाहून घेतलेले असून मागील १२ वर्षांत त्यांच्या प्रश्नांसाठी प्रत्येक सरकारच्या विरोधात लढत राहिलो आणि यापुढे माझ्या शिक्षकांसाठी मी लढत राहणार असल्याचेही मोते म्हणाले. आपल्याला यावेळी निवडणुकीला उभे राहायची इच्छा नव्हती शेकडो शिक्षकांनी आपल्याला यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली यामुळे आपण एकुणच शिक्षक आणि शिक्षणासाठीची राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आपण पुन्हा मैदानात आलो असून या निवडणुकीत कोकणातील शिक्षक हे कोणाच्याही दबावाला, अमिषाला बळी पडणारे नसल्याने ते योगदान पाहूनच आपला उमेदवार निवडतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मोते यांना अनेक शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. सिंधुदूर्ग जिल्ह्याचे शिक्षक परिषदेचे विभागीय कार्यवाह सुधाकर तावडे यांनी मोते यांच्या पाठिशी परिषदेचे कोकणातील शिक्षकांचे १७ जिल्हे असून त्यांनी एकमताने त्यांची निवड केली होती. यामुळे तेच आमचे शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले तर आमदार म्हणून मोते यांनी शिक्षकांना सन्मान आणि एक आवाज मिळवून दिला असून त्यांनाच आम्ही निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला. तर रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यवाह शंकरराव मोरे यांनीही मोते यांची तुलना कोकण विभागीय मतदार संघातील एकाही उमेदवारांशी चुकूनही होणार नाही, त्यांच्यासारखेच आमदार हे शिक्षकांना न्याय मिळवून देतात असे स्पष्ट केले. तर कोकणातील शिक्षक हे संयमी, हुशार असून ते पैसे मोजणाºयाला, दबाव आणणाºयाला मतदान करणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे लोकप्रतिनिधी हा सरकारला मार्गदर्शक असावा सांगितले होते त्याचे उत्तम उदाहरण हे मोते आहे. त्यांनी केलेले विधानपरिषदेतील तालिका सभापती आणि आश्वाासन समितीचे अध्यक्ष म्हणून काम हे त्याचे प्रमाण असल्याचेही मोरे म्हणाले.
यावेळी आदिवासी वसतीगृह समिती, मायनॉरिटी शिक्षक सेल, मुख्याध्यापक संघ, मुंबई शिक्षक पतपेढी, पालघर शिक्षक परिषदेसह विविध जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी आमदार मोते यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवत त्यांना पुन्हा विजयी करण्याचे आश्वासन दिले.

Post Bottom Ad