महिला कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून सुप्रिया सुळे करणार मुंबई महापालिका निवडणुक प्रचाराची सुरूवात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 January 2017

महिला कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून सुप्रिया सुळे करणार मुंबई महापालिका निवडणुक प्रचाराची सुरूवात

मुंबई : 16 Jan 2017 -
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक १७ जानेवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेच्या प्रचार मोहिमेला आक्रमकपणे सुरूवात करत आहे. परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघातील महिला कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून या मोहिमेला सुरूवात होत असून पुढील तीन दिवस उत्तर पश्चिम, उत्तर मध्ये आणि उत्तर मुंबई या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवारांच्या निवडणुक कार्यालयांचे त्यांच्या हस्ते उदघाटन केले जाणार अाहे.
तब्बल पंचेचाळीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता प्रचारातही आघाडी घेतली आहे. पर‌ळच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघात सकाळी अकरा वाजता मुंबई महिला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे या महिला मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई महापालिकेतील रस्ते घोटाळा,नालेसफाई घोटाळा, टॅब घोटाळा यासारख्या मुद्द्यांवर त्या या मेळाव्यातील आपल्या भाषणादरम्यान काय भाष्य करणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्यानंतर सायंकाळी उत्तर पश्चिम जिल्ह्यातील उमेदवारांच्या निवडणुक कार्यालयांचे उदघाटन त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. बुधवार दिनांक १८ जानेवारी आणि गुरूवार दिनांक १९ जानेवारी रोजीही सायंकाळी मा. सुप्रियाताई सु‌ळे यांच्या हस्ते उत्तर मध्य आणि उत्तर मुंबईतील काही उमेदवारांच्या निवडणुक कार्यालयांचे उदघाटन केले जाणार आहे. यावेळी मा.सुप्रियाताई ठिकठिकणच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Post Bottom Ad