कोलकाता : नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमधील अंतर्गत बळकटीला शिथिल केले असू यामुळे देशांतर्गत वार्षिक उत्पादनाचे मूल्य (जीडीपी) दोन टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे. यामुळे जीडीपी पाच टक्क्य़ांवर येईल, असा इशारा नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष मॉन्टेकसिंह अहलुवालिया यांनी दिला आहे.
भारतीय वाणिज्य मंडळाच्या सद्यंच्या बैठकीमध्ये त्यांनी हा इशारा दिला. या वर्षी जीडीपी ५ ते ५.५ टक्के राहू शकतो असे मत त्यांनी मांडले. ते म्हणाले की, विद्यमान सरकारने नोटबंदी तर केली पण त्यामुळे होणार्या त्रासाला जरी स्वीकारले असले तरी दीर्घकालीन फायद्याबाबत मात्र कोणतीही योजना तयार केलेली नाही. त्यामुळे सात टक्क्य़ांवर वृद्धीचा दर आणता कसा येईल, ही खरी चिंतेची बाब आहे. काळ्या पैशाला संपुष्टात आणण्याचा असलेला हा उपाय योग्य असून मात्र स्थिती अधिक चांगली करण्यासाठी करांचे दर हे आकर्षक बनवायला हवेत. जमिनीच्या व्यवहारांमध्ये काळ्या पैशाला मोठे स्थान आहे. पण हा विषय खास करून राज्य सरकारच्या अखत्यारित येतो. त्याचप्रमाणे राजकीय देणग्यांबद्दलही सुधारमा करणे ही महत्त्वाची बाब आहे.