मुंबईत एमआयएम ७६ जागांवर उमेदवार उभे करणार - दलित उमेदवारांना प्राधान्य - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 January 2017

मुंबईत एमआयएम ७६ जागांवर उमेदवार उभे करणार - दलित उमेदवारांना प्राधान्य

मुंबई -बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडनुकीत ‘एमआयएम’ (मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन) पक्ष २२७ पैकी ७६ जागांवर उमेदवार उभे करणार असून तिकीट वाटपात दलित उमेदवारांना प्राधान्य देणार आहे. ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने समाजवादी पक्ष अाणि काँग्रेस ‘मुस्लिम व्हाेट बँक’ मानणाऱ्या दोन्ही पक्षांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

‘एमआयएम’ने मुंबई महापािलका निवडणुकीचा जोरदार तयारी चालवली आहे. पक्षाध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या आतापर्यंत दोन सभाही पार पडल्या आहेत. पुढील काळात असदुद्दीन व त्यांचे बंधू तथा पक्षाचे फायरब्रँड नेते अामदार अकबरुद्दीन यांच्या एकूण तीस सभांचे पक्षाने नियोजन केले आहे, अशी माहिती आंध्र प्रदेशातील आमदार अाणि पक्षाचे मुंबई निरीक्षक अहमद बलाला यांनी दिली. २२७ नगरसेवकांच्या मुंबई महापालिकेत काँग्रेसचे ५२ अाणि समाजवादी पक्षाचे ९ नगरसेवक आहेत. ‘एमआयएम’ने मुस्लिमबहुल भागावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात मालवणी, कुर्ला, भायखळा, नागपाडा या भागांचा समावेश आहे. आजपर्यंत येथून सपा अाणि काँग्रेसचे नगरसेवक निवडून येत होते. मुंबईतील मुस्लिम युवकांत ‘एमआयएम’बाबत प्रचंड उत्सुकता अाणि आपुलकीही आहे. त्यात एमआयएम दलित कार्ड खेळणार आहे.

- मुंबई महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प ३७ हजार कोटींवर गेला आहे. देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून या पालिकेकडे पाहिले जाते. मात्र, आजपर्यंत युतीने झोपडपट्टी अाणि मुस्लिम वस्त्यांना निधी देण्यात दुजाभाव केल्याचा मुद्दा ‘एमआयएम’ प्रचारात उपस्थित करणार आहे.
- काँग्रेस, राष्ट्रवादी अाणि समाजवादी पक्षाला धक्का देत एमअायएम यंदा मुंबई मनपात प्रवेश करील, असा दावा स्थानिक नेत्यांकडून केला जात अाहे. मात्र, या पक्षामुळे अापसूकच शिवसेना- भाजपला फायदा हाेईल, असे अाडाखेही बांधले जात अाहेत.
- भाजप अाणि शिवसेनेच्या नेत्यांचे ओवेसी बंधूंच्या भाषणाकडे बारीक लक्ष आहे. एमआयएमचे नेते जितकी भडक विधाने करतील, तेवढे युतीला हवे अाहे. कारण त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने मतांचे ध्रुवीकरण हाेण्यास मदत हाेईल, अशी त्यांची अटकळ आहे.

Post Bottom Ad