मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागातील अधिकारी आणि अधिकार्यांच्या दलालाला पैसे घेताना लाच लुचपत विभागाद्वारे अटक केल्याचा राग म्हणून पालिकेने पाल यांचे घर तोडले. आपले घर बांधून मिळावे, आणि अधिकार्यांच्या दलालाच्या सर्व अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी म्हणून पाल हे गेले दिड दोन वर्ष पालिकेच्या फेऱ्या मारल्यावर आयुक्त अजोय मेहता यांनी याबाबत कारवाईचे आदेशही दिले आहेत. परंतू आयुक्तांच्या आदेशाला स्थानिक अधिकारी भीक घालत नसल्याने पाल यांनी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. सोमवार 9 जानेवारीपासून सतत दोन दिवस आंदोलन करणाऱ्या पाल यांच्याकड़े मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
रामदुलार पाल हे भांडुपच्या तुळशेतपाडा येथे राहतात. ते राहत असलेली जागा १६ सप्टेंबर १९७६ साली महाराष्ट्र शासनाने गलिच्छ वस्ती म्हणून जाहिरी केली आहे. रामदुलार पाल यांच्याकडे ते राहत असलेल्या जागेवरील १९९४ पूर्वीचे पुरावे आहेत. या वस्तीमधील इतर रहिवाश्यांनी येथील स्थानिक गुंड आणि पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ३० फुटाची घरे बांधली आहेत. पाल यांनीही आपले घर पालिका अधिकारी आणि स्तःनिक गुंडाला भिक न घालता १९ फुटाचे केले. याची तक्रार पालिकेकडून तक्रार आणि पालिकेने पाल यांच्या बांधकामाला तोडण्याची नोटीस रद्द करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. लाच मागणाऱ्या विरोधात लाच लुचपत विभागात तक्रार केल्यावर १० हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना कनिष्ठ अभियंता योगेश पंडित व तक्रारदार दलाल रामसुरत यादव यांना २५ जुलै २०१५ रोजी अटक केली आहे. अभियंत्याला अटक करताच इतर अधिकाऱ्यांनी पाल यांना धडा शिकवण्यासाठी भर पावसाळ्यात नियम धाब्यावर बसवत त्यांचे घर ऑगस्ट २०१५ मध्ये तोडले आहे.
याबाबत पाल हे गेले एक वर्ष पालिकेचे एस विभाग कार्यालय, उपायुक्त, आणि पालिका आयुक्त यांच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. पाल यांनी मुंबईच्या आझाद मैदानात याविरोधात उपोषणही केले आहे. मानवी हक्क आयोग आणि लोकशाही दिनी आयुक्तांची भेट घेतल्यावर पाल यांचे घर बांधून देण्याचे तसेच पालिका अधिकाऱ्यांचा दलाल असलेल्या रामसुरत यादव याची सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्तांनी दिलेल्या आदेशा नंतर गेल्या 14 महिन्यात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पालिका आयुक्त तसेच मानव अधिकार आयोगाने याबाबत कारवाई करण्याचे आदेश देवूनही कारवाई केली जात नसल्याने पाल यांनी पालिका मुख्यालयासमोर आपले आंदोलन सुरु केले आहे.