चार लाख ७८ हजार फुटांत उभी राहणार १८७ कोटींची इमारत -
मुंबई (प्रतिनिधी) – विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयाच्या परिसरात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय’ उभारण्यात येणार आहे. या महाविद्यालयासाठी सहा मजली इमारत बांधण्यात येणार असून या इमारतीच्या बांधकामासाठी १८७ कोटी रुपये खर्च येणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी निविदा काढण्यास परवानगी देण्यात आली असून लवकरच ही निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
डॉ. रु. न. कूपर महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या परिसरात प्रस्तावित असणाNया वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी दरवर्षी १५० विद्याथ्र्यांना प्रवेश दिला जाणार आहे. 'मेडीकल कॉन्सिल ऑफ इंडिया'च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अत्याधुनिक पद्धतीची व वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन असलेली इमारत ४ लाख ७८ हजार ९९४ चौरस पुâटात उभी राहणार आहे. इमारतीवर 'सोलर पॅनल्स' बसविण्यात येणार आहेत. तसेच इमारतीमध्ये वर्षा जलसंचयन व्यवस्था कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इमारतीमधील सांडपाण्याचा पुनर्वापर करता यावा यासाठी 'सांडपाणी प्रक्रिया केंद्र' असणार आहे.
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित १ विद्याशाखांंसाठी स्वतंत्र व विशिष्टपूर्ण रचना या इमारतीमध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. प्रत्येकी १८० विद्यार्थी क्षमतेचे ४ सभागृह व ३५० क्षमतेचे एक सभागृह या इमारतीमध्ये असणार आहे. त्याचसोबत सुसज्ज ग्रंथालय, वैद्यकीय संग्रहालय, प्रात्यक्षिक खोल्या, प्रयोगशाळा, भांडार, उपहारगृह, विद्याथ्र्यांच्या सांस्कृतीक व क्रीडा विषयक कार्यक्रमांसाठी जागा इत्यादी बाबी देखील या इमारतीमध्ये असणार आहेत. इमारतीच्या तळघरात १०६ चार चाकी वाहनांसाठी वाहनतळ असण्यासोबतच वातानुकूलन यंत्रणा, विद्युत पुरवठा विषयक उपकरणांसाठी खोली, पाणी साठवण टाक्यांसह पंपहाऊस प्रस्तावित आहे.