लवकरच जुन्या नोटांचा हिशेब देणार - रिझर्व्ह बँक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 January 2017

लवकरच जुन्या नोटांचा हिशेब देणार - रिझर्व्ह बँक

मुंबई : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँका व टपाल कार्यालयात जमा झालेल्या जुन्या नोटांची नेमकी संख्या व इतर तपशील लवकरच जाहीर केली जाईल. सध्या बँकांत प्रत्यक्ष असलेली शिल्लक आणि जमा झालेल्या जुन्या नोटा यांचा मेळ साधण्याचे काम सुरू असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी स्पष्ट केले.

अवैध ठरवल्या गेलेल्या जवळपास ९७ टक्के नोटा ३0 डिसेंबर २0१७ या अंतिम मुदतीपर्यंत बँकांकडे परत आल्या असल्याचे अंदाज व्यक्त करणारे व विविध स्रोतांचा हवाला देणारे वृत्त गेल्या दोन दिवसांत प्रसिद्ध झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बँकेने अद्यापि मोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, असे स्पष्ट करणारे हे खुलासेवजा निवेदन केले. देशभरातील चलन भांडारांमार्फत (करन्सी चेस्ट) कळवल्या गेलेल्या विवरणानुरूपच चलनातून अवैध ठरलेल्या जमा नोटांचा एकत्रित आकडा आजवर रिझर्व्ह बँकेकडून जाहीर केला गेला आहे, असेही तिने स्पष्ट केले. रद्द झालेल्या नोटांसंबंधी अखेरची माहिती १0 डिसेंबर २0१६ रोजी रिझर्व्ह बँकेने दिली. त्यानुसार, १२ लाख ४४ हजार कोटी रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्याचे सांगण्यात आले होते. विविध वृत्तसंस्था आणि वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनी चलनातून रद्दबातल ठरलेल्या १५.४४ लाख कोटी रुपयांपैकी ५0 दिवसांच्या नोटबंदी प्रक्रियेदरम्यान सुमारे १५ लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडे परत आले असण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे एकूणच या निर्णयाच्या यशापयशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Post Bottom Ad