विजेची हाताळणी करताना सजग रहा - सतिश करपे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विजेची हाताळणी करताना सजग रहा - सतिश करपे

Share This
मुंबई :'विजेची उपकरणे हाताळताना तसेच विज यंत्रणेवर काम करताना सतर्क राहून काम केले पाहिजे. कारण छोटी चुकही आपल्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे विजेची कामे करताना सर्वानीच सजग राहणे गरजेचे असते. तसेच सुरक्षेबाबतचे सर्व नियम नेहमी पाळले पाहिजेत जेणेकरून संभाव्य अपघात टाळला जाऊ शकेल.’ असे मत महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता सतिश करपे यांनी व्यक्त केले. यावेळी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्र, भांडुपच्या अधीक्षक अभियंता साधना खांडेकर उपस्थित होत्या.
भांडुप नागरी परिमंडळात ११ ते १७ जानेवारी २०१७ या कालवधीत ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ साजरा करण्यात येत असून त्याच्या उद्घाटना प्रसंगी सतिश करपे बोलत होते. या सप्ताहात भांडुप येथील मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांच्यात विद्युत सुरक्षेबाबत जागृती करण्यात येणार आहे.

सतिश करपे पुढे म्हणाले, “वीज सुरक्षेबरोबरच वीज बचातीबाबत ही लोकांनी जागृत राहणे गरजेचे आहे. कारण उर्जेची बचत ही एकप्रकारे उर्जेची निर्मिती असते. याबाबत शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये जागरुकता निर्माण केल्यास हा विचार प्रत्येक घरात पोहचवणे शक्य होईल. कारण हीच मुले उद्याची सुजाण नागरिक बनणार आहेत.”

साधना खांडेकर यावेळी म्हणाल्या, “ग्राहक हा कोणत्याही व्यवेस्थेचा कणा असतो, त्यामुळेच ग्राहकांना त्यांच्या सुरक्षेततेच्या दृष्टीने मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून जागरूक करण्यात येणार आहे.”

यावेळी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी सुरक्षेबाबतची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांनी मानले. यावेळी कार्यकारी अभियंता (प्रशासन) जाफर खान , सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.स.) नेमिलाल राठोड, सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, उप महाव्यवस्थापक(मां.तं) महेश दुरशेलवार तसेच भांडुप नागरी परिमंडळातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संखेने उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages