भीम अॅपच्या वापरासाठी भाजयुमोचे हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाला पत्र - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 January 2017

भीम अॅपच्या वापरासाठी भाजयुमोचे हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाला पत्र

मुंबई 12 जानेवारी 2017 - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातली कॅशलेस इंडिया ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष मा. मोहित कंबोज यांनी केले अाहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मा. कंबोज यांनी देशातील पंचतारांकीत हॉटेल्सची अधिकृत संघटना असलेल्या "हॉटेल असोसिएशन ऑफ इंडिया'ला पत्र लिहिले आहे.आपल्या ग्राहकांना अधिकाधिक कॅशलेस व्यवहारांसाठी उद्युक्त करण्याचे आवाहन या पत्राद्वारे त्यांनी या संघटनेच्या अध्यक्षांना केले आहे. 
भारत सरकारने सध्या कॅशलेस इंडियाचा नारा दिला आहे. कॅशलेस इंडिया मोहिमेत अधिकाधिक भारतीयांचा सहभाग असावा, तसेच कॅशलेस व्यवहारांचा एक सहजसोपा पर्याय सर्वांना उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच"भीम'हे अॅप लॉन्च केले आहे. या अॅपचा अधिकाधिक वापर करून कॅशलेस इंडियाला हातभार लावण्याचे आवाहन जरी पंतप्रधानांनी केले असले तरीही देशभरातील पंचतारांकीत हॉटेल्सपैकी एकाही हॉटेलने या "भीम' अॅप किंवा इतर कोणत्याही"मोबाईल वॉलेट'ची सुविधा आपल्या ग्राहकांना देऊ केलेली नाही. ही बाब लक्षात घेता मा. कंबोज यांनी हॉटेल्स मालकांची संघटना असलेल्या "हॉटेल असोसिएशन ऑफ इंडिया'ला पत्र लिहिले आहे. अधिकाधिक लोकांना कॅशलेस व्यवहारांसाठी आपण प्रवृत्त न केल्यास केंद्र सरकारचा मुळ उद्देश सफल होणार नाही, असे सांगत मा.कंबोज म्हणाले की, पंतप्रधानांच्या कॅशलेस इंडिया मोहिमेचा एक स्वयंसेवक या नात्याने मी या पत्राद्वारे विनंती केली की, संबंधित संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्या संस्थेच्या प्रत्येक सदस्याला निर्देश देऊन कॅशलेस इंडिया मोहिम यशस्वी करण्यासाठी"भीम'अॅप किंवा इतर कॅशलेस पर्यायांच्या वापरासाठी अधिकाधिक ग्राहकांना उद्युक्त करावे.

देशाच्या पर्यटन व्यवसायवृद्धी प्रक्रियेतील एक महत्वाचा घटक या नात्याने ही संस्था केंद्र सरकारच्या कॅशलेश इंडिया मोहिमेत एक निर्णायक भुमिका घेऊन सहभागी झाल्यास अधिकाधिक लोक कॅशलेस व्यवस्थेत येऊ शकतात. देशातील विविध पंचतारांकीत हॉटेल्सचे व्यवस्थापन जेवढ्या अधिक प्रमाणात देशी तसेच परदेशी ग्राहकांना कॅशलेश व्यवहारांसाठी उद्युक्त करेल, तेवढीच भारताची अर्थव्यवस्था स्वच्छ आणि सुदृढ करण्याच्या प्रक्रियेला बहुमोल हातभार लागणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच देशात अस्थैर्य माजवू पाहणाऱ्या दहशतवादी घटकांना आणि काळा पैशाची निर्मिती करणाऱ्या घटकांना रोखण्याच्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनाही त्यामुळे बळ मिळेल असेही ते म्हणाले. या पत्रासोबत भीम अॅप आणि सध्या उपलब्ध असलेल्या विविध कॅशलेस मोबाईल वॉलेट्सच्या पर्यायांची माहिती उपलब्ध करून देणारी एक प्रतही जोडण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणून १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चाने भीम अॅपची माहिती घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष मोहित कंबोज यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या मोहिमेसाठी आम्ही" घर घर जाएंगे भीम अॅप पहुचाएंगे' ही घोषणा दिली आहे. त्यानुसार आम्ही घरोघरी जाऊन लोकांना कॅशलेस मोबाईल अॅप आणि इतर पर्यायांची माहिती देणार आहोत. त्यासाठी अगोदरच आम्ही "आय अॅम कॅशलेस व्हॉलेंटीयर ' या नावाने एका अभिनव उपक्रमाची सुरूवात केली आहे. तब्बल दोन हजार पेक्षा अधिक युवकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला असून या प्रतिनिधींच्या माध्यमातून अाम्ही नागरिकांना कॅशलेस पर्यायांची माहिती करून देणार आहोत, असेही ते म्हणाले.

Post Bottom Ad