मुंबई - केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत डिसेंबर 2016 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल दि. 21 फेब्रुवारी 2017 रोजी घोषित झाला आहे. यावेळी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे नि:शुल्क प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकाराने अभिरुप मुलाखत चाचणी क्षमतावृद्धी कार्यक्रमाचे आयोजन राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत दिल्ली येथे विद्यार्थ्यांसाठी अभिरुप मुलाखतीचे सत्र चालविले जाणार असून त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनात या प्रशिक्षण सत्राचे आयोजन केले जाणार आहे.
या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन 25 मार्च 2017 ते मे 2017 दरम्यान केले जाणार आहे. या काळात प्रत्येक शनिवार व रविवारी अभिरुप मुलाखत सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी समन्वय म्हणून डॉ. प्रमोद कमलाकर लाखे तर सहाय्यक समन्वय म्हणून बी.एम.तराळ यांची राज्य शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेण्यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर नोंदणीसाठी दिनांक 30 मार्च 2017 पूर्वी pramodlakhe67@rediffmail.com या ईमेलवर अर्ज पाठविण्यात यावेत. नोंदणी करीता www.siac.org.in या संकेतस्थळावरील नोंदणी अर्ज भरुन नोंदणी करावी, असे आवाहन उच्च शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. अधिक संपर्कासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल क्र.०९४२२१०९१६८/०९८१९०९३४१० दूरध्वनी क्रमांक ०२२-२२०७०९४२ यावर संपर्क साधावा. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथीलअभिरुप मुलाखत चाचणी क्षमतावृद्धी कार्यक्रमाचा फायदा घ्यावा असे आवाहनही उच्च शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.