मालदा दि 26 - दलित आदिवासींसाठी लढन्याचा दावा करणाऱ्या नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यात मारलेले सीआरपीएफ चे 25 जवान हे सुद्धा दलित आदिवासिंतुनच केंद्रीय राखीव पोलिस दलात भर्ती झाले होते . त्यामुळे नक्षलवाद्यांचे दलित आदिवासी प्रेम बेगड़ी आहे .त्यांना जर खरेच दलित आदिवासिंचा विकास करायचा असेल तर त्यांनी हिंसक मार्ग सोडून देशाच्या मुख्यप्रवाहात सामील व्हावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. छत्तीसगढ़च्या सुकमा जिल्ह्यात जेवत बसलेल्या बेसावध सी आर पी एफ़ च्या जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा रामदास आठवले यांनी तीव्र निषेध केला असून नक्षलवाद्यांचा बिमोड केला पाहिजे असे मत व्यक्त केले .
पश्चिम बंगाल च्या मालदा जिल्ह्यातील नूरपुर येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी आठवलेंनी आगामी 2021 च्या पश्चिम बंगाल विधासनसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जिंच्या सत्तेला धक्का देऊ आणि भाजप च्या नेतृत्वात एन डी ए ची सत्ता प्रस्थापित करू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विचारमंचावर रिपाइंचे पश्चिम बंगाल प्रदेश अध्यक्ष मृत्युंजय मलिक मुरसद शेख मौलाना काशिरुल मंडल विनोद निकाळजे आदि अनेक मान्यवर उपस्थित होते .
पश्चिम बंगाल मध्ये नामशुद्र दलित22 टक्के; मुस्लिम 27 टक्के; आदिवासी 7 टक्के यांच्यासह ओबीसिंची एकजुट उभारणार असा निर्धार रामदास आठवले यांनी व्यक्त केला. कम्युनिस्टांची सत्ता तृणमूलच्या ममता बॅनर्जींनी खेचुन घेतली तशीच पुढील निवडणुकीत सन 2021 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात आरपीआय सह सर्व एनडीए तृणमूलला पराभूत करतील असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला