धनगर आरक्षणा संदर्भात रविवारी चिंतन परिषद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 April 2017

धनगर आरक्षणा संदर्भात रविवारी चिंतन परिषद

मुंबई / प्रतिनिधी - धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचे लाभ देण्यासंदर्भातील १९५६ च्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी करावयाच्या उपाययोजनासदर्भात रविवारी, २३ एप्रिल रोजी बारामती (जि.पुणे) येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे धनगर समाजाच्या राज्यस्तरीय चिंतन परिषदेचे आयोजन केले आहे.

राज्यात गेली तीन वर्षे धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा सुरु आहे. या लढ्याची पुढील वाटचाल आणि राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आरक्षणासंदर्भात झालेली प्रगती यावरही या परिषदेत सविस्तर मंथन होणार आहे. परिषदेला धनगर समाजाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कायदेतज्ज्ञ, आरक्षणाच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी आिण समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी महिती धनगर आरक्षण समितीचे राज्य समन्वयक नवनाथ पडळकर यांनी िदली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad