मुंबई. – वक्फ मालमत्तेचे दुसरे सर्वेक्षण सुरू झाले असून या सर्वेक्षण ला मुसलमान बांधवांनी सहकार्य करावे असे आव्हान अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी केले आहे. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या शिष्ठमंडळाशी बोलताना त्यांनी सांगितले.
समाजाला समजून समाजाच्या समस्या, मूळ प्रश्नाला समजून आपण काम करत आहात त्याबद्दल मुसलमान समाजाच्या वतीने अन्सारी यांनी तागडे यांचे धन्यवाद दिले. 'तहरी के औकाफ' आज संपूर्ण महाराष्ट्रात कशा पद्धतीने कार्यरत आहे याची माहिती दिली. तसेच ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ९२ हजार एकर जमीन असून १ लाख मालमत्ता हि वक्फ बोर्डाची असून त्यासाठी ४३ कर्मचारी त्यात ९ शिपाई, १ वाहन चालक आहे. तर एवढ्या मोठ्या कारभाराला हे कर्मचारी सांभाळू शकतात का असा प्रश्न उपस्थित केला होता. गोंदिया जिल्ह्यातून लोकं येतात नोंदणी चे २५०० प्रकरणे प्रलंबित आहेत. ते आजपर्यंत मार्गी लागत नाही. हेरिंग साठी कोण भेटत नाही, लोकं थकून गेली, हैराण झालेत, परेशान झालीत. यांची कैफियत मांडली होती. कर्मचाऱ्यांच्या अभाव असल्याने त्यासाठी ग्रँड दिली गेली पाहिजे, किमान ६ कार्यालय झाली पाहिजेत, तर मुख्यमंत्र्यांनी मुंबई, नागपूर, औरंगाबाद असे ३ कार्यालय देतो, तसेच ७७० कर्मचारी देखील देण्याचे कबुली दिली होती. तर १०० कोटींची ग्रँड मागणी केली असता २०० कोटी देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते यावर लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा तागडे यांच्या कडे अन्सारी यांनी केली. वक्फ बोर्डात जर पहिल्या पासून चांगले काम झाले असते तर आज आम्ही खूप चांगले काम केले असते असे तागडे यांनी सांगितले. वक्फ बोर्ड हे वेल्टीलेटर आहे त्यात नक्कीच सुधार होईल असे आश्वासन अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी दिले. मालमत्तेचे जे दुसरे सर्वेक्षण सुरु आहे. त्याबद्दल तागडे यांनी आव्हान केले आहे की, समाजाच्या विविध संघटनांनी जिल्ह्यातील तालुका स्थरावर गावे-गावे फिरून लोकांशी चर्चा करून वक्फ मालमत्तेची माहिती घेऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी पर्यंत ती पोहचावा जेणे करून परिपूर्ण सर्वेक्षण होण्यास मदत होईल तसेच त्यासंदर्भात मी स्वतः दौरा करणार असल्याचे तागडे यांनी सांगितले. त्यावर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी आमच्या कडून वक्फ संदर्भात जनजागृती मोहीम केली जात असल्याची माहिती दिली. यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सोलापूर चे अध्यक्ष इसाक खडके, मुल्ला मुलाणी समाजाचे अध्यक्ष शाहरुख मुलाणी, सइद खान, पुणे सदस्य सिराज शेख, सयेद शकील, परभणी चे अध्यक्ष सयेद फारूक, मिर्झाअब्दुल कय्युमनदवी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment