दलित पँथरच्या चळवळीमुळेच मंत्रीपदापर्यंत पोहोचलो - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दलित पँथरच्या चळवळीमुळेच मंत्रीपदापर्यंत पोहोचलो - रामदास आठवले

Share This
मुंबई - दलितांवरिल अन्याय अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी दलित पँथर झंझावाताप्रमाणे देशभर वाढली .दलित पँथरच्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या त्यागातून आपले नेतृत्व उभे राहिले. आणि केंद्रीयमंत्री मंडळापर्यंत मजल आपण मारू शकलो असे कृतज्ञ उदगार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले.


पुणे येथील नेहरू मेमोरियल हॉल येथे पँथर च्या चळवळीत काम केलेल्या कार्यकार्त्यांचा रामदास आठवलेंच्या हस्ते पँथर गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले त्या सोहळ्यात आठवले बोलत होते.  यावेळी विचार मंचावर रिपाइंचे हंगामी राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय सोनवनी स्वागताध्यक्ष शशिकला वाघमारे शैलेंद्र चव्हाण, संगीताताई आठवले, अशोक शिरोळे, अमानुल्ला खान,   जगन्नाथ गायकवाड, मोहन जगताप, मधुकर काशिद, बाबूराव घाडगे,  निता अडसूले, प्रदीप साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले सामाजिक आर्थिक समतेचा विचार सामाजिक ऐक्याचा नारा देत दलित पँथर देशभर पोहोचली. अनेक राज्यात पँथरच्या शाखा स्थापन झाल्या माझ्या खांद्याला खांदा लावून पँथर सामाजिक क्रांतिसाठी लढत राहिले. घराकड़े कुटुंबाकड़े दुर्लक्ष करून अनेक पँथर कार्यकर्ते आन्दोलनातून जेल मध्ये गेले पण हिम्मत न सोडता पँथर कार्यकर्ते माझ्या नेतृत्वात आंदोलनात लढत राहिले. अनेक आंदोलने पँथरने जिंकली जातिवाद्यांवर आपल्या आक्रमकतेची दहशत बसविली पँथरच्या चळवळीमुळेच माझे नेतृत्व मोठे झाले असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले. कार्यकर्त्यांनी निस्वार्थ कार्यरत रहावे. नेता म्हणून काम करु नये कार्यकर्ता म्हणून काम करीत रहावे मी नेता म्हणून काम केले नाही कार्यकर्ता म्हणूनच काम करीत राहिलो असे आठवले म्हणाले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages