पालिकेकडे क्रांतिवीर चाफेकर बंधूंचा इतिहास नसल्याने शिलालेख उभारण्याचा प्रस्ताव पडून - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 April 2017

पालिकेकडे क्रांतिवीर चाफेकर बंधूंचा इतिहास नसल्याने शिलालेख उभारण्याचा प्रस्ताव पडून


मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेच्या ऐ विभागाच्या सहायक आयुक्तांना क्रांतिवीर चाफेकर बंधूंचा इतिहास माहित नसणे हि दुर्दैवाची बाब आहे. यामुळे २५ जून २०१३ रोजी मंजूर झालेल्या क्रांतिवीर चाफेकर बंधूंच्या बलिदानाची माहिती देणारा शिलालेख अथवा शिल्प उभारण्याचा प्रस्तावावर अद्यापपर्यंत अंमलबजावणी होऊ शकलेली नाही, स्वातंत्र्यासाठी हुतात्मा पत्करलेल्यांची हि अवहेलना असल्याचा आरोप मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी आज विधी समितीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे केला.

क्रांतिवीर चाफेकर बंधूंच्या बलिदानाची माहिती नवीन पिढीला व्हावी या उद्देशाने २५ जून २०१३ रोजी ठराव क्रमांक १७ द्वारे चाफेकर बंधूंची माहिती देणारा शिलालेख अथवा शिल्प उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता सदर ठराव पुढील अभिप्रायासाठी आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता , मात्र , ए विभागाच्या सहायक आयुक्तांना चाफेकर बंधूंच्या इतिहासाची माहिती न मिळाल्याने गेली चार वर्षे सदर ठरावाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही हि बाब महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत घडते याची लाज वाटायला हवी , असे दिलीप लांडे यांनी म्हटले आहे. 

नगरसेवकांच्या पत्रव्यवहाराला उत्तर देण्याची जबाबदारी पालिका आयुक्तांची असताना प्रस्तावांची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांवर टाकून प्रशासन हात झटकत असून याचा खुलासा करण्यात यावा अशी मागणी यावेळी लांडे यांनी केली . 

दरम्यान प्रबोधनकार ठाकरे यांचा अर्धपुतळा पालिका सभागृहात बसवण्याची मागणी २०१४ साली होऊनही आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही अशाप्रकारचे २७ विविध ठराव त्या त्या वेळी सदस्यांकडून मांडण्यात आले होते. मात्र प्रशासन झोपेचे सोंग घेत यावर अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांना जागे करण्याचे काम विधी समितीला करावे लागेल, यासाठी विधी समितीची विशेष सभा आयोजित करून पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना विशेष बाब म्हणून बोलाविण्यात यावे अशी सूचनाही दिलीप लांडे यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad