कुलभूषण जाधव यांना न्‍याय मिळवून द्या - अॅड आशिष शेलार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुलभूषण जाधव यांना न्‍याय मिळवून द्या - अॅड आशिष शेलार

Share This
मुंबई, दि. ११ - पाकिस्‍ताने फाशिची शिक्षा सुनावलेले कुलभूषण जाधव यांच्‍याबाबत मुंबईकर आणि महाराष्‍ट्रातील जनतेच्‍या भावना तीव्र असून त्‍यांना न्‍याय मिळावा, याबाबत केंद्र सरकारने ठोस भूमिका घेऊन त्‍यांना न्‍याय द्यावा, अशी आग्रहपूर्व मागणी करीत आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. 

कुलभूषण जाधव हे मुंबईतील रहिवाशी असून त्‍यांना फाशीची शिक्षा झाल्‍याचे वृत्‍त येताच जनमाणसामध्‍ये संताप आणि तीव्र भावना आहे. आज याप्रश्‍नी दुपारी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. तर संध्‍याकाळी मुंबई भेटीवर असणारे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही त्‍यांनी भेट घेतली. जाधव यांना नैसर्गिक न्‍यायाने बाजू मांडण्‍याची संधी मिळाली नाही. केंद्र सरकारने याबाबत ठोस भूमिका घेऊन त्‍यांची बाजू प्रभावीपणे मांडावी व त्‍यांची सुटका करण्‍याबाबत विशेष प्रयत्‍न करावेत, जनमाणसातील याबाबत‍च्‍या भावना सराकरपर्यंत थेट अधिकृतपणे पोहचाव्‍या म्‍हणून आपण ही भेट घेतली. जाधव यांना न्‍याय मिळावा अशी जनतेच्‍यावतीने आपण गृहमंत्र्यांना विनंती केल्‍याचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages