मुंबई - पावसाळ्यात उद्भवणाऱ्या लेप्टोस्पायरासिस आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्या आरोग्य खात्याने कंबर कसली आहे. दृकश्राव्य माध्यमांबरोबरच रेडिओच्या सहाय्याने जनजागृती करण्यात येत आहे. एफएम ९१. १ या रेडिओ वाहिनीसाेबत पालिकेने १५ दिवसाचा करार केला असून दिवसातून सहा वेळा ४५ सेंकदाची जिंगल प्रकाशित करण्यासाठी पावनेतीन लाख रुपये मोजले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.
मुंबई, उपनगरांत डेंग्यू, मलेरियाचे प्रमाण वाढते आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर डेंग्यूची साथ पसरण्यास सुरुवात होते. तर पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिस हा आजार होतो. उंदीर, घुशी, कुत्रे, गाई-गुरे आदी लेप्टोस्पायरोसिसचा संसर्गित जनावरांच्या मुत्राव्दारे, दूषित झालेले पाणी, अन्न, माती याव्दारे लेप्टोस्पाययरीसचा संसर्ग होतो. झपाट्याने या आजार वाढ होत आहे. हा आजार गंभीर असल्याने बाधीत रुग्णाला याेग्य व तात्काळ उपचार न मिळाल्यास मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य खात्याचा प्रयत्न आहे. यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यावर पालिकेने भर दिला आहे. मुंबईत रेडिओचा दैंनदिन वापर केला जातो. रेडिओद्वारे दिलेले संदेश सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहचतात. शिवाय, लोकांना याकरिता वेगळा वेळ द्यावा लागत नाही. त्यामुळे पालिकेने एफएम ९१. १ या रेडिओवाहिनीसाेबत १५ दिवसाचा करार केला आहे. दिवसाला सहा वेळा ४५ सेंकदाची जिंगल ही प्रकाशित केली जाणार असून याकरिता २ लाख ८५ हजार ६६० रुपये देण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment