जैविक कचऱ्यातील वापरेल्या सुया पुन्हा वापरात - एसएमएस कंपनीवर कठोर कारवाई करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 April 2017

जैविक कचऱ्यातील वापरेल्या सुया पुन्हा वापरात - एसएमएस कंपनीवर कठोर कारवाई करा


मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईतील जैविक कचऱ्यातील वापरेल्या सुया पुन्हा वापरात येत असून या जैविक कचऱ्याची विल्हेवाट करण्याची जबाबदारी सोपविलेल्या एसएमएस कंपनीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुधार समितीत मंगळवारी केली निवासी भागात कचऱ्याची विल्हेवाट लावणारी ही कंपनी असून स्थानिक भागातील नागरिकांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यामुळे ही कंपनी तातडीने स्थलांतरीत करावी अशी मागणी समितीतसमितीत करण्यात आली. 

पालिका मानखूर्द येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे निवासी वस्तीत 2008 पासून जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम या कंपनीने सुरू केले आहे. मुंबईच्या विविध रुग्णालयातून गोळा केलेला जैविक कचरा येथे आणला जातो. कचऱ्यावर सात प्रकारची प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागते. मात्र तशी प्रक्रिया कचऱ्यावर होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. येथे आणलेल्या कचऱ्यातून इंजेक्‍शनच्या सुया, सलाईनच्या बाटल्या तसेच इतर वस्तूंचा पूनर्वापर होत आहे. येथे जैविक कचरा नष्ट केला जाताना त्याच्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या कंपनीला येथे परवानगी देताना सीआरझेच्या नियमांचेही उल्लंघन झाले आहे. हा प्रकार गभीर असून या कंपनीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी सुधार समितीत एका हरकतीच्या मुद्याद्वारे केली.

नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक असलेल्या या कंपनीवर राजकीय वरदहस्त असल्याने या कंपनीवर कारवाई होत नाही, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी केला. मुख्यमंत्र्यासह आरोग्य आणि पर्यावरण विभागाशी पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad