मुंबई, दि. 25 : इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेची आज सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी पाहणी करुन आढावा घेतला. बडोले यांच्यासोबत स्मारकाचे वास्तुविशारद शशी प्रभू, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. स्मारकाच्या जागेवर मिलच्या जुन्या बांधकामांचे तोडकाम झाले असून या कामांची बडोले यांनी पाहणी केली. यावेळी स्मारकाचे पुढील काम कसे सुरू करता येईल, जागेवरील झाडांचा उपयोग कसा करता येईल,याबद्दल यावेळी त्यांनी वास्तूविशारदांशी चर्चा केली.
यावेळी बडोले म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे भव्य स्मारक उभारण्यासाठी जमीन हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून स्मारकासाठी मिलची संपूर्ण साडेबारा एकर जागा राज्य शासनाच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे स्मारकाच्या उभारणीची जागतिक निविदा काढण्यात आली असून त्याची प्रक्रिया दोन महिने चालणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होईल.
तत्पूर्वी बडोले यांनी स्मारकासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक घेतली. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते. इंदू मिलच्या जागेवर स्मारकासंदर्भात फलक लावण्याच्या सूचना यावेळी बडोले यांनी केल्या.
No comments:
Post a Comment