मुंबई ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत आहे यातील सार्वजनिक शौचालयाचा वापर करणा-या मुंबईकरांनी मुंबईतील अस्वच्छ असलेल्या शौचालयाच्या विरोधात नोंदवलेल्या तक्रारीची दखल पालिकेने घेतली आहे. अस्वच्छ ठेवणा-या संस्था चालकांना पालिकेने कारणे दाखवा नोटीसा पाठवली आहे. नोटिसानंतरही अशा संस्था चालकांनी दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय़ पालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान गेटवे ऑफ इंडिया येथील सुलभ 83 टक्के अस्वच्छ असलेल्या इंटरनॅशनल या संस्थेक़डील शौचालयाचा ताबा पालिकेने काढून घेतला आहे.
मुंबईतील सार्वजनिक शौचालये किती स्वच्छ ठेवली जातात, त्यांची देखभाल संस्था चालकांकडून केली जाते का, शुल्क आदींबाबत पालिकेने लोकांची मते जाणून घेतली. त्यासाठी पालिकेने मुंबईतील विविध ठिकाणच्या 54 सार्वजनिक शौचालयांचा पालिकेने सर्व्हे केला. या शौचालयांमध्ये नागरिकांती मते नोंदवण्यासाठी यंत्र लावण्यात आले होते. त्यानुसार मागील चार महिन्यांपासून शौचालयाचा वापर करणा-या 89 लाख लोकांनी आपली मते नोंदवली. शौचालय स्वच्छ, अस्वच्छ, शुल्क नियमानुसार घेतले जाते का यावर नागरिकांनी संबंधित यंत्रावर बटन दाबून प्रतिक्रिया नोंदवल्या. त्यानुसार 54 शौचालयांमधून 50 टक्केपेक्षा अधिक अस्वच्छ असलेली 9 शौचालये आढलली आहेत. त्यांना पालिकेने कारणे दाखवा नोटिस पाठवली आहे. गेटवे येथील 83 टक्के अस्वच्छ असलेल्या शौचालयाचा ताबा संबंधित संस्था चालकाकडून काढून घेण्य़ात आला आहे. निट देखभाल न करता अस्वच्छ शौचालये ठेवणा-या संस्था चालकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली असून कारवाई करण्याबाबत आदेशही देण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.
50 टक्क्याहून अधिक अस्वच्छ असलेले शौचालये- सुलभ इंटरनॅशनल, गेटवे -- 83 टक्के
- सर्वलोक विकास सेवा, समतानगर -- 97 टक्के
- सुलभ शौचालय, बांद्रा तलाव --- 65 टक्के
- सर्वलोक सेवा मंडळ देवीपाडा -- 86 टक्के
- बिर्ला लेन, जूहू - 91 टक्के
- ओल्ड मुंबई पुणे बसस्टॅन्ड, दादर पूल-- 69 टक्के
- ग्रॅन्ड रोड -- 84 टक्के
- सुलभ जे. पी. रोड, सात बंगलो, 60 टक्के