भाजपाच्या विकासाच्या अजेंड्याचे पनवेलमधील तरूण मतदारांना आकर्षण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजपाच्या विकासाच्या अजेंड्याचे पनवेलमधील तरूण मतदारांना आकर्षण

Share This

पनवेल : २८ एप्रिल - मेट्रोद्वारे मुंबईशी होत असलेला वेगवान संपर्क, हाकेच्या अंतरावर होऊ घातलेला ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, पनवेल रेल्वे स्थानकाचे टर्मिनसमध्ये होत असलेले रुपांतर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या सर्व प्रकल्पांना केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारने दिलेली चालना यामुळे आगामी दहा बारा वर्षांत या परिसराचा चेहरा मोहराच बदलून जाणार आहे. भाजपाने सध्या देशात आणि राज्यात विकास हाच प्रमुख मुद्दा घेऊन सुरू केलेल्या या कारभाराचे पनवेलमधील तरूण मतदारांनाही आकर्षण असून पनवेल महापालिकेचा कारभारही त्याच पद्धतीने व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेली अनेक वर्षे जुन्या पनवेलमधील अरुंद रस्ते, उघडी आणि तंुबलेली गटारे,रस्त्यातील खड्डे आणि वाहतुक कोंडी हे चित्र कायम होते. मात्र उच्च शिक्षण घेऊन स्मार्ट झालेल्या आणि स्मार्ट फोन वापरणाऱ्या तरूण पिढीला हे चित्र बदलावे अशी अपेक्षा होती. स्मार्ट पिढीच्या या अपेक्षांना पनवेलचे तरूण आणि अभ्यासू आमदार मा. प्रशांत ठाकूर यांनी सर्वात प्रथम सकारात्मक प्रतिसाद दिला. आपल्या नगराध्यक्षपदाच्या तसेच आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये पनवेल शहरात विकास कामांचा धडाका लावत त्यांनी उड्डाण पूल, नाट्यगृह, उपजिल्हा न्यायालय,प्रशासकीय भवन, क्रिडा संकुल आणि आंबेडकर भवन यासारखे प्रकल्प मार्गी लावले. मा. आमदारांच्या या प्रयत्नांना आता राज्य आणि केंद्र सरकारची देखील साथ लाभली आहे. सध्या जुन्या पनवेलमधील प्रमुख रस्त्यांचे वेगाने काँक्रिटीकरण केले जात असून बंद गटारे आणि प्रशस्त रस्त्यांमुळे शहरातील वाहतुक कोंडीचा प्रश्नही बऱ्यापैकी मार्गी लागला आहे. विकासाचे हे चित्र आता शहरातील तरूण मतदारांना आकर्षित करू लागले आहे. विकासाची ही प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी,अशी या तरूण वर्गाची अपेक्षा आहे. शिवाय आगामी काळात आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागात मोठ्या प्रमाणात राेजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. शहर चहुबाजूने विस्तारत चालल्याने पायभूत सुविधांची उभारणी करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर असणार आहे. हे सर्व आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी तेवढ्याच सक्षम नेतृत्वाची गरज आहे. केंद्रातील तसेच राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या पारदर्शी कारभारामुळे पनवेल महापालिकेतही भाजपाची सत्ता आल्यास विकासाच्या अनेक वाटा खुल्या होऊ शकतील, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages