गुवाहाटी दि 28 - ईशान्य भारत हा दुर्गम प्रदेश आहे. येथील सर्व राज्यांतील जनता विकासापासून वंचित राहिली आहे. इशांन्येतील सातही राज्यांचा पूर्ण विकास साधण्याचे प्राधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करणार असा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
ईशान्य भारतातील राज्यांचा विकास करण्यासाठी प्राधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रियमंत्र्यांना दिलेल्या आदेशानुसार ना. रामदास आठवले हे आज आसाम च्या दौऱ्यावर आले होते . त्यावेळी गुवाहाटी येथे आसाम ; नागालँड; मणिपुर; मिझौराम; मेघालय; या राज्यांचे सामाजिक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ आठवलेंना भेटले. आपल्याकडे असलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या सर्व योजना येथे वेगाने कार्यन्वित करू तसेच आवश्यक तेव्हढा निधि उपलब्ध करून देऊन तसेच प्रलंबित ज्या योजना असतील त्यांचा आढावा घेऊन त्या त्वरित पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असुन ईशान्य भारतातील सर्व राज्यांचा विकास साधन्यास आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले .
आसाम दौऱ्या दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आसाम चे राज्यपाल महामहिम बनवारीलाल पुरोहीत यांची भेट घेतली. आसाम च्या विकासाबाबात उभयतांमध्ये दीर्घ चर्चा झाली . या सदिच्छा भेटित राज्यपाल महामहिम बनवारीलाल पुरोहित यांनी रामदास आठवले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पादाचा कार्यभार स्विकारल्यापासून अनेक चांगल्या भूमिका घेतल्या आहेत. सवर्णांमधील गरिबांना आरक्षण देण्याची भूमिका आठवलेंनी मांडल्याबद्दल राज्यपाल पुरोहित यांनी आठवलेंचे अभिनन्दन केले. तसेच विदर्भातुन पुढे आलेले नेतृत्व आणि त्यानंतर आसाम च्या राज्यपाल पादाचा बहुमान मिळाल्याबद्दल महामहिम बनवारीलाल पुरोहित यांचे ना रामदास आठवले यांनी अभिनन्दन केले. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची ना रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आसाम च्या विकासाबाबतच्या नव्या योजनांचा आढावा घेतला .
दरम्यान गुवाहाटी येथील हाईकोर्टच्या जवळील डिस्ट्रिक्ट लायब्ररी हॉल मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या आसाम राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यास रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. महामानव डॉ बाबासाहेब अम्बेडकरांनंतर अपनास केंद्रीय मंत्रीमंडळात देशसेवा करण्याची संधी मिळाली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या विविध योजना राबवून दलित आदिवासींचा सामाजिक आर्थिक विकास साधणार असे सांगून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार राष्ट्राचा विकास साधणारे सर्वव्यापक विचार आहेत अंबेडकरी विचारांचा ईशान्य भारतात प्रसार करा. ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्ष मुळ धरत असल्याबद्दल ना रामदास आठवलेंनी कार्यकार्त्यांचे कौतुक केले. डॉ बाबासाहेब अम्बेडकारांच्या रिपाइंचा ईशान्य भारतातील गवागावात प्रसार करा असे आवाहन रामदास आठवलेंनी केले.