पूर्णा प्रकरणी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करणार - राजकुमार बडोले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 April 2017

पूर्णा प्रकरणी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करणार - राजकुमार बडोले


मुंबई २८- (प्रतिनिधी ) - पुर्णा दगडफेक प्रकरणातील दोषींवर कडक करवाई करण्याची मागणी आंबेडकर ब्रिगेड, संविधान गौरव बहुजन महामोर्चाने केली असून यासंदर्भात आज सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन दिले. पुर्णा प्रकरणा संदर्भात अनुसूचित जाती आयोगाचा अहवाल मागविण्यात आला असून लवकरच आपण मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहोत अशी माहिती बडोले यांनी यावेळी दिली .


पूर्ण दगडफेक प्रकरणी आंबेडकर ब्रिगेडचे अध्यक्ष अशोक कांबळे, सविंधान गौरव बहुजन महामोर्चाचे निमंत्रक राजू झनके तसेच आबेडकरी चिंतन बैठकीचे संयोजक महादू पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज मंत्रालयात बडोले यांची भेट घेतली. पुर्णा दगडफेक प्रकरणामागे शिवसेनेच्या नेत्यांचा हात असल्याचे म्हटले जात असून तसा आरोप ही पुर्णा येथील स्थानिक लोकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर करवाई करण्यात यावी. तसेच दगडफेक प्रकरणात जखमी झालेल्यांना शासकीय मदत देण्यात यावी. एट्रोसिटी कायदाअंतर्गत दगडफेक प्रकरणातील अन्य आरोपीं विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत. परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेला सुरक्षितेची हमी देऊन त्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती आंबेडकरी ब्रिगेडचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिली.

पूर्णता दगडफेक प्रकरणी अनुसूचित जाती जमाती आयोगाने नुकतीच पूर्ण येथे भेट दिली आहे या आयोगाचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भीत घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल अशी ग्वाही बडोले यांनी शिष्टमंडळाला दिली

Post Bottom Ad