वाढत्या प्रदूषणाने जगभरात ४२ लाख लोकांचा बळी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वाढत्या प्रदूषणाने जगभरात ४२ लाख लोकांचा बळी

Share This

मुंबई - वाढते प्रदूषण ही जागतिक समस्या आहे. प्रदूषणाबाबत लोक जागरूक नसल्याने प्रदूषणाचा फटका नागरिकांना बसत आहे. सन २0१५ मध्ये जगभरात प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक मृत्यू भारत आणि चीनमध्ये झाले असल्याचे अमेरिकेतल्या हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. आतापर्यंत प्रदूषणाने ४२ लाख लोकांचा बळी घेतला आहे. 


भारत आणि चीनमध्ये सर्वाधिक प्रदूषण आहे. ४२ लाखांपैकी २२ लाख लोकांचा मृत्यू भारत आणि चीनमध्ये झाला आहे. म्हणजे प्रत्येक देशात ११ लाख लोकांचा बळी गेल्याचे आढळून आले आहे. जगभरातील ९२ टक्के जनता अनारोग्य हवा असलेल्या ठिकाणी राहत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे लोकांना गंभीर आजार होऊन त्यांचे बळी जात आहेत. कर्करोग, हृदयरोग, दमा असे घातक आजार या प्रदूषणामुळे होत आहेत. भारत आणि चीनमध्ये ११-११ लाख लोक दगावले असल्याचे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे चीनने प्रदूषण रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून त्यामुळे आता तिथे आजार आटोक्यात आले आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष डॅन ग्रीन बम यांनी म्हटले आहे.

प्रदूषणाबाबत भारताला मोठी मजल मारायची आहे. भारतात दिवाळीदरम्यान प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हा प्रकार घडत असल्याचे जाणकारांचे मत आहे. प्रदूषणामुळे जगभरातील शहरांची अवस्था बिकट आहे. प्रदूषणामुळे फुप्फुसाचे आजार होऊन लोक दगावत असल्याचे अहवालात म्हटले आहे. भारतातील या विषयावर काम करणार्‍या अनुप्रिता राय-चौधरी यांनी भारताने प्रदूषणाबाबत दक्ष राहिले पाहिजे, जेणेकरून श्‍वसनाचे होणारे आजार आटोक्यात येतील. भारत यावर गंभीर विचार करेल, अशी अनेकांनी आशा व्यक्त केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages