मुंबई / प्रतिनिधी -
भाजपा सरकारने बिल्डर धार्जिणा विकास आरखडयाची अंमलबजावणी करण्यास आणि मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यास भाजपाला अपयश आल्याने याचे खापर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्यावर फोडले आहे. अजोय मेहता यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. मेहता यांच्यासह इतर सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले आहे. अजोय मेहता यांच्या जागी मुख्यमंत्र्यांच्या खास जवळचे असलेले अधिकारी यू. पी. एस मदान यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
गुरुवारी उशिरा यासंदर्भातले आदेश जारी करण्यात आले. अजोय मेहता यांची नियुक्ती केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकंय्या नायडू यांच्या मंत्रालयात होणार आहे. ते येत्या 20 मे रोजी नवा पदभार स्विकारतील अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मुंबईच्या विकास आराखडयाला विरोध झाल्याने तसेच ५० हजारहून अधिक हरकती आल्याने मुंबईचा सन २०१४ - २०३४ चा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांना रद्द करावा लागला होता. तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांच्या जागी अजोय मेहता यांची नियुक्ती करत नव्याने विकास आराखडा बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

भाजपाचे आणि बिल्डर लॉबीचे चांगले संबंध असल्याने विकास आराखडा बिल्डर धार्जिणा बनवून त्याची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी आयुक्त म्हणून मेहता यांच्यावर होती. परंतू गेल्या दोन वर्षात विकास आराखडा मंजूर करून घेण्यास मेहता यांना अपयश आले आहे. केंद्र आणि राज्यामध्ये भाजपाचे सरकार असल्याने महानगरपालिकेतही भाजपाला सत्ता मिळवण्यासाठी निर्णयांमध्ये भाजपाला झुकते माप देण्याचे व या माध्यमाने भाजपाला मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवून देण्याची जबाबदारी आयुक्त म्हणून मेहता यांच्यावर होती. मेहता यांच्या काळात नाले सफाई, रोड इत्यादी घोटाळे उघड झाले. सत्ताधारी शिवसेनवर या घोटाळ्याचे खापर भाजपाने फोडले तरीही भाजपाला महापालिकेची सत्ता मिळवता आलेली नाही.
अजोय मेहता यांच्यासह संजय भाटिया, मालिनी शंकर, अजय भूषण पांडे, मुकेश खुल्लर आणि भगवान सहाय या अधिकाऱ्यांचीही अन्यत्र नियुक्ती होणार आहे. अजोय मेहता हे 1994 बॅच चे अधिकारी आहेत तर यू. पी. एस मदान हे 1983 बॅचचे अधिकारी आहेत. मदान हे सध्या सर्वात वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. शिवाय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आणि विश्वासातले अधिकारी म्हणुन ओळखले जातात. यामुळे मदान यांना महापालिकेचे आयुक्त बनवून मुंबईच्या विकास आराखडयाच्या अंमलबजावणीची खास जबाबदारी देण्यात येणार आहे.