दिव्यांगांच्या नोकरितील अनुशेषाचा आठवलेंनी घेतला आढावा -
राष्ट्रीयकृत बाँकांकड़ून मागसवर्गीयांना केलेल्या कर्जवाटपाचाही घेणार आढावा -
मागासवर्गियांचाही अनुशेष भरणार -
मुंबई दि 6 - खाजगी क्षेत्रात दलित आदिवासींसह इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळावे यासाठी देशभरात मागणी वाढत आहे. त्यानुसार खाजगी क्षेत्रात मागासांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे सांगत पदोन्नतिमध्ये दलित आदिवासिंना आरक्षणाची तरतूद असलेले राज्यसभेत मंजूर झालेले विधेयक लोकसभेत मंजूर व्हावे यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. सह्याद्री अतिथि गृह येथे आज दिव्यांगांच्या नोकरितील अनुशेषाचा आढावा घेतल्यानंतर त्याबाबतची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.
राज्य शासनाकड़ून 42 कोटी रुपये हमी म्हणून दिले नसल्याने महात्मा फुले मागास्वर्गीय महामंडळला एन एफ डी सी कडून मागील सहा वर्षापासून कर्ज दिले जात नाही. त्यावर तोड़गा म्हणून महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाकडील निधीच्या व्याजातून ती रक्कम दिली जाईल त्यासाठी अर्थमंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेच आठवले म्हणाले. प्राधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय कृत बँकांना दलित युवकांना स्वयंरोजगारासाठी कर्ज देण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार आता पर्यंत किती दलित बेरोजगारांना बँकांनी कर्ज दिले याचा आढावा घेणारी बैठक लवकरच आयोजित करणार असल्याचे आठवले म्हणाले. दलित तरुणांना स्वयंरोजगार देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर संपूर्ण महाराष्ट्रात विभाग निहाय घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. तसेच लवकरच दलित आदिवासींचा नोकरितील अनुशेष भरणार असल्याचे आठवले म्हणाले
दिव्यांग व्यक्तिंना 3 टक्के आरक्षणाप्रमाणे नोकरितील अनुशेषाचा आढावा आज ना रामदास आठवले यांनी घेतला त्यानुसार मुंबई महापालिकेत ऐकून 79 हजार पदे असून त्याच्या 3 टक्के प्रमाणे 2450 पदे दिव्यांगांसाठी भरली पाहिजेत. त्यात 1250 पदांचा अनुशेष असल्याचे आज पालिकेने लवकरच भरणार असल्याचे आजच्या बैठकीत मान्य केले. त्याचप्रमाणे दिव्यांगांचा खादी ग्रामोद्योग मध्ये 122 जागांचा अनुशेष आहे जेएनपिटी मध्ये केवळ 1 जागेचा अनुशेष आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागात 113 जागांचा अनुशेष आहे बीपीटी मध्ये क्लास वन च्या 9 जागांचा अनुशेष बाकी आहे. राज्यशासना मध्ये 2 हजार 572 जागांचा अनुशेष बाकी आहे. मुंबई विभागीय एयर इंडियामध्ये 405 जागांचा अनुशेष बाकी आहे. यासर्व प्राधिकरणांनी येत्या 6 महिन्यात दिव्यांगांच्या नोकरितील अनुशेष भरला पाहिजे असे निर्देश आठवले यांनी दिले. 6 महिन्यांनंतर पुन्हा याबाबत आढावा बैठक घेऊन दिव्यांगांचा नोकारितील अनुशेष भरला की नाही याची शहानिशा करणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
दिव्यांगांसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाकडून 7 इंस्टिट्यूट चालविल्या जातात त्यांच्या साठी 68 कोटी केंद्र सरकारने मदत दिली आहे. सुगम्य भारत योजने द्वारे कानाचे मशीन, आर्टिफिशियल हात, पाय, अश्या प्रकारच्या दिव्यांग जणांना उपयुक्त 7 लाख वस्तुंचे वाटप सन 2014 आणि 15 मध्ये करण्यात आल्याची माहिती आठवले यांनी दिली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे. 3 लाख कोटी रुपयांचे कर्ज महाराष्ट्रवर आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफीसाठी 30 हजार कोटी रुपये आणायचे कुठून त्याचा सल्ला विरोधी पक्षाने अभ्यास करून द्यावा, केवळ विरोध करून विधिमंडळाचे कामकाज बंद पाडण्यापेक्षा सभागृहात चर्चा करावी. असे आवाहन आठवलेंनी केले.