मुंबई - जेष्ठ साहित्यीक भीमसेन देठे दि. ६ मे २०१७ रोजी दु. १ वा. कर्करोगाच्या आजाराने शांती आवेदन आश्रम, मुंबई येथे शेवटचा श्वास घेतला. ते ७०वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी, मुलगी, नातू असा परिवार आहे. त्यांचे शेवटचे विधी बौद्ध पद्धतीने ६ मे २०१७ (त्याच दिवशी ) रोजी रात्री ८ वा मालाड, मालवणीच्या त्यांच्या राहत्या घरा जवळ होतील. २ वर्ष ते रक्ताच्या कर्क रोगाने आजारी होते.
चक्री या अभिजात कादंबरीचा उदय त्यांच्या लेखणीतून झाला. अनेक मराठी साहित्याचे पुरस्कार त्यांच्या नावावर कोरलेले आहेत. मराठी साहित्यात देठे यांच्या कविता आणि कादंबरी यावर अनेक संशोधनाचे विद्यार्थी संशोधन करत आहेत. मागास समाजाच्या व्यक्ती त्यांच्या साहित्यात नायकाच्या भूमिकेतून साकार झाल्या. ते आयुष्य भर सरकारी नोकरीत होते. सरकारी अधिकारी (R.O.) म्हणून सेवा निवृत्त झाल्यावर पूर्ण पणे समाजासाठी त्यांनी वाहून घेतले. या निर्णयामागे त्यांचा पूर्ण परिवार त्यांच्या मागे होता. समाजाचं काम करत यांनी शेवटचा श्वास घेतला.
दलितांच्या जीवनातील इस्कोट मांडणारा महान साहित्यिक हरपला - रामदास आठवलेमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिमुळे समाजपरिवर्तन झाले. सामाजिक परिवर्तनाच्या लढयात दलितांनी संघर्ष केला. अनेकांच्या आयुष्याचा इस्कोट झाला. तो इस्कोट; त्यातील त्याग आणि वेदना साहित्यात शब्दबद्ध करणारा महान साहित्यिक भीमसेन देठे यांच्या निधनाने हरपला आहे अश्या शब्दान्त रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केन्द्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत साहित्यिक भीमसेन देठे यांना आदरांजली वाहिली आहे.
ज्येष्ठ अंबेडकरी साहित्यिक भीमसेन देठे यांचे आज दीर्घ आजाराने वयाच्या 70 व्या वर्षि निधन झाले . मालवणी मालाड येथे रात्री त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यात ना रामदास आठवले सहभागी झाले होते. दिवंगत भीमसेन देठे यांच्या परिवाराची आठवलेंनी सांत्वनपर भेट घेतली.
दिवंगत भीमसेन देठे हे उत्कृष्ट क्षमतेचे ताकदीचे साहित्यिक कवी कथाकार होते त्यांची चक्री इसकोट डबुल गिरहान घुसमट रिडल्स तूफानातील दिवे झाकळ ही पुस्तके गाजली. अंबेडकरी साहित्यिक म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान होता त्यांचे मराठी साहित्य विश्वात मोठे योगदान आहे त्यांचे माझे व्यक्तिगत संबंथ खुप घनिष्ट होते असे ना रामदास आठवले म्हणाले. ज्येष्ठ साहित्यिक भीमसेन देठे यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि अंबेडकरी चळवळीची झालेली हानि भरून येणार नाही अश्या भावना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केल्या आहेत.