चार वर्षीय पपलू १0 दिवसांनी सापडली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 May 2017

चार वर्षीय पपलू १0 दिवसांनी सापडली


मुंबई - दादर रेल्वे पोलिसांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे ८ मे रोजी दादर स्थानकातून बेपत्ता झालेली चार वर्षीय पपलू सुनील मोहिते ही चिमुरडी १0 दिवसांनी तिच्या आई-वडिलांना परत मिळाली. आपली चिमुरडी सापडल्याने तिच्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांचे आभार मानले आहेतसोलापूरच्या बार्शीवरुन पोलिसांनी या चिमुरडीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी दादर पोलिसांनी लक्ष्मण काळे (50) नावाच्या इसमाला अटक केली आहे.


चार वर्षीय पपलू आपल्या आइसोबत 8 मे रोजी दादरला आली होती. घरी निघण्यासाठी फलाट क्रमांक 5 वर आली. पपलूसाठी खाऊ घेत असताना तिचा हात सुटला आणि ती अचानक गायब झाली. तिच्या आईने तिला सर्वत्र शोधले, पण काही उपयोग झाला नाही. पोलिसांनी शोध काढूनही हाती काहीच न लागल्याने पोलिसांनी आपला मोर्चा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडे वळवला. त्यात पपलू एका मुलीसोबत चालत असल्याचे पोलिसांना दिसले. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या या मुलीला जीआरपीने तत्काळ गाठलं. मुलीकडे चौकशी केल्यावर तिने पपलूला पोलीस चौकीपर्यंत नेल्याचं संगितलं, पण चौकी बंद असल्याने आपण मुलीला तिथंच सोडल्याचं देखील स्पष्ट केलं.

पोलिसांनी चौकीजवळील कॅमेरे तपासल्यावर पपलू त्यांना माटुंग्याच्या दिशेने जाताना दिसली. पोलिसांनी तिथल्या सगळ्या झोपडपट्टया पिंजून कढल्यावर तिथल्या एका महिलेने पपलूला काळे कुटुंबासोबत पहिल्याचं सांगितलं. पोलिसांनी काळे कुटुंबीयांकडे चौकशी सुरु केली. सुरूवातील आपल्याला काहीच माहीत नसल्याचं सांगणाऱ्या काळे कुटुंबीयांना पोलिसांनी इंगा दाखवल्यावर मात्र लक्ष्मण काळेने पपलूला बार्शीला नेल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलीस तात्काळ बर्शीला रवाना झाले आणि पपलूची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी आम्ही आरोपीला अटक केली असून त्याने नेमके या मुलीचे अपहरण का केले? याचा तपास करत असल्याची माहिती मध्य रेल्वे जीआरपीचे डीसीपी समाधान पवार यांनी दिली.

Post Bottom Ad