उल्हासनगर - दुकानातील चकली मस्करीने खाल्ल्याचा राग मनात ठेवून दुकानदार व त्याच्या दोन मुलांनी दोन अल्पवयीन मुलांची धिंड काढून त्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात आरोपी पिता-पुत्रांविरोधात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उल्हासनगर-५ येथील हिललाईन पोलीस ठाण्याजवळ असलेल्या प्रेमनगर टेकडी परिसरातील मस्जिद जवळ हा प्रकार घडला. शनिवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास सुनील व अनिल (नावात बदल) हे अनुक्रमे ८ व ९ वर्षांची भावंडे आपल्या घराजवळ खेळत होती. काही वेळानंतर ही भावंडे दुकानाजवळ उभी होती. दुकानदार परिचयाचा असल्यामुळे मस्करीमध्ये सुनील व अनिल यांनी दुकानातील चकली खाल्ली. दुकानदार मेहमूद जुबेला पठाण (६९) याला या गोष्टीचा राग आला व त्याने सुनील व अनिल यांना बेदमपणे मारहाण केली. यानंतर मेहमूद याची दोन मुले इरफान पठाण (२६) व तौकल ऊर्फ सलीम पठाण (२२) यांनीदेखील सुनील व अनिल यांना अर्धनग्न करून मारहाण केली. तसेच त्यांचे अर्धे केस मुंडन करून त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला आणि धिंड काढली. तब्बल दीड तास हा प्रकार चालल्यानंतर एका महिलेने हा प्रकार थांबवला व मुलांना आपल्या ताब्यात घेतले.
पीडित मुलांच्या आई-वडिलांनी स्थानिक नागरिक व भारिप युवा आघाडीचे अॅड. जय गायकवाड यांच्या मदतीने हिललाईन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे यांनी महमूद पठाण यांच्यासह त्यांची मुले तौलिक व इरफानवर अॅट्रोसिटी अॅक्टसह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शिवसेना, रिपाइं, भारिप, पीआरपीसह भाजपाने या घटनेचा निषेध केला. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त ठेवला आहे.
पीडित मुलांच्या आई-वडिलांनी स्थानिक नागरिक व भारिप युवा आघाडीचे अॅड. जय गायकवाड यांच्या मदतीने हिललाईन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे यांनी महमूद पठाण यांच्यासह त्यांची मुले तौलिक व इरफानवर अॅट्रोसिटी अॅक्टसह पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.