महापालिकेची फॅशन स्ट्रीटवरील स्टॉल्सधारकांवर सोमवारी कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 May 2017

महापालिकेची फॅशन स्ट्रीटवरील स्टॉल्सधारकांवर सोमवारी कारवाई



मुंबई - चर्चगेटजवळील फॅशन स्ट्रीटवर महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेत व्यवसाय न करता, सर्रासपणे रस्त्यात गारमेंटची विक्री करण्यात येते. या बेकायदा आणि अतिक्रमण करणा-या स्टॉल्सधारकांना नोटिस देऊनही आपले सामान रस्त्यावरून हटवत नसल्याने महापालिकेच्या ‘ए’ विभागाकडून या स्टॉल्सधारकांवर सोमवारी कारवाई करण्यात येणार आहे. 


शुक्रवारी येथील अनेक गारमेंट व्यावसायिकांचे ‘लायसन्स’ ए विभागाने रद्द केले आहे. त्यानंतर त्यांना २४ तासांत रस्त्यावरील संपूर्ण लाकडी सामान हटवून पदपथ मोकळे करण्याच्या लेखी सूचना देऊनही, शनिवारी सामान न हटवल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार होती.  शनिवारी पालिकेच्या ए विभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी येथे कारवाई करण्यासाठी गेले असता, अनेक व्यापाऱ्यांनी बराच वेळ गोंधळ घालत कारवाई करु न दिल्याने पालिकेच्या पथकाला हात हलवत परतावे लागले. अतिक्रमण केलेल्या येथील ४९ व्यावसायिकांना २० जानेवारी २०१७ रोजी नोटीस दिल्यानंतरसुद्धा त्यांनी त्याची दखल घेतली नाही. २३ जानेवारी २०१७ रोजी पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या अधिका-यांनी फॅशन स्ट्रीटची तपासणी केली असता, दुकानदारांनी काहीच सामान हटवले नसल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती पालिकेच्या ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. अखेरीस शनिवारी परवाना विभागाने त्यांचे सामान जप्त करण्याचा निर्णय घेतला. अधिकारी व कर्मचारी तेथे पोहचले असता स्टॉल्सधारकांनी त्यांना गराडा घालून तसेच बराचवेळ गोंधळ - आरडाओरड करुन कारवाई करुच दिली नाही. यामुळे सोमवारी पोलिसांची मदत घेऊन कारवाई करण्यात येणार आहे,

Post Bottom Ad