खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मागर्दर्शनाखाली आमदार, विभाग प्रमुख, माजी महापौर सुनील प्रभु यांच्या आमदार निधि मधून, दिंडोशी विधानसभेतील, आनंदवाडी कुरारगाव येथील वकील बग्गा चाळ येथे स्थानिक लोकांसाठी, प्रत्येक शौचालयात २४ तास पाण्याची उपलब्धतता असलेली आधुनिक सुविधायुक्त अशा शौचालयाचे लोकार्पण आमदार सुनिल प्रभु यांनी केले तसेच आनंदवाडी ते बग्गा चाळ पर्यंत नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याचे देखील लोकार्पण करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक प्रशांत कदम, विधानसभा संघटक अनघा साळकर, शाखा प्रमुख कृष्णा देसाई, उपविभाग संघटक पूजा चौहान, शाखा समन्वय कृतिका शिर्के यांच्यासह असंख्य शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते. आधुनिक सुविधायुक्त २४ तास पाणी उपलब्ध असलेली शौचालय वापरास मिळाल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी सुनील प्रभु यांचे आभार मानले.