बेस्ट उपक्रमात प्रधानमंत्री जन औषधी केंद्रे सुरु करण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 May 2017

बेस्ट उपक्रमात प्रधानमंत्री जन औषधी केंद्रे सुरु करण्याची मागणी


मुंबई - ८ मे २०१७ नुकतीच भारत सरकारतर्फे प्रधानमंत्री जन औषधे केंद्रे सुरु करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून उच्च प्रतीची औषधें व उपकरणे इत्यादी जनसामान्यांना किफायतशीर दरामध्ये उपलबध करून देण्यात येत आहेत , या योजनेचा फायदा बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाच्या सर्व बस आगारे व कर्मचारी वसाहतींमध्ये प्रधानमंत्री जन औषधे केंद्रे सुरु करण्यात यावीत अशी मागणी बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी बेस्ट प्रशासनास केली आहे,

प्रधान मंत्री जन औषधी केंद्रांच्या माध्यमातून उच्च प्रतीची औषधे , तसेच या केंद्रांमध्ये मधुमेह , हृदयविकार , रक्तदाब इत्यादी रोगांवरील दुर्मिळ औषधे व इतर ५०० हुन अधिक औषधे तसेच , मोठ्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी महत्वाची उपकरणे सवलतींच्या दरांमध्ये उपलबध करून दिली जात आहेत. ,तसेच या योजने अंतर्गत उपलबध होत असलेल्या औषधांच्या तसेच उपकरणांच्या किंमतीमध्ये सुमारे ७५ टक्के सूट दिली जात असल्याने या योजनेचा लाभ उपक्रमाच्या सेवकवर्ग सदस्यांसाठी होणे खूप आवश्यक असल्याचे सुनील गणाचार्य यांनी बेस्ट प्रशासनास पत्राद्वारे कळविले आहे. 

बेस्ट उपक्रमाचे कर्मचारी विविध बस आगारांमध्ये विविध दवाखान्याच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार घेत असतात व याकरिता बेस्ट तर्फे मोठ्या प्रमाणावर औषधांची तसेच उपकरणांची खरेदी करण्यात येत असते . बेस्ट उपक्रमाची सध्याची आर्थिक परिस्तिथी लक्षात घेता प्रधानमंत्री जन औषधी योजना बेस्ट उपक्रमास फायदेशीर ठरेल असे सुनील गणाचार्य यांनी म्हटले आहे. 

Post Bottom Ad