भाजपा बहुरुप्याची भूमिका पार पाडत आहेत - रवी राजा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 May 2017

भाजपा बहुरुप्याची भूमिका पार पाडत आहेत - रवी राजा

मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकी नंतर बाजार उद्यान समितीच्या बैठकीत राणीबाग मधील पेंग्विन पाहण्याचे दार वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. सदर भाववाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यावर भाजपाला जाग आली असून आता याला विरोध केला जात आहे. यामुळे भाजपा आपले बहुरुप्याची भूमिका पार पाडत असल्याची टिका महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे. बाजार उद्यान समितीमध्ये काँग्रेसची सदस्य संख्या कमी असली तरी आम्ही विरोध केला. हा प्रस्ताव बहुमताने बाजार व उद्यान समितीमध्ये मंजूर झाला असला तरी स्थायी समिती व सभागृहात काँग्रेस याला जोरदार विरोध करेल असे रवी राजा यांनी सांगितले.


मुंबई महापालिकेच्या भायखळा राणीबाग मध्ये हम्बोल्ट पेंग्विन कक्ष सुरु करण्यात आले. सध्या पेंग्विन पाहण्यासाठी राणीबागेसाठी लागू असलेले शुल्क आकारण्यात येत आहे. सध्या लहान मुलांसाठी २ रुपये तर प्रौढांसाठी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला. यानुसार एकाच कुटुंबातील आई वडील आणि दोन मुलांना १०० रुपये, एका कुटुंबा व्यतिरिक्त एखादा लहान मुलगा किंवा मुलगी असल्यास प्रत्येकी २५ रुपये अतिरिक्त शुल्क घेतले जाणार आहे. मुलांसोबत नसलेल्या पती पत्नी व्यतिरिक्त एखादा प्रौढ व्यक्ती किंवा दोन प्रौढ व्यक्ती पेंग्विन पाहण्यास आल्यास त्यांना प्रत्येकी १०० रुपये तर त्यांच्यासह आलेल्या मुलांना प्रत्येकी २५ रुपये शुल्क लागू केले जाणार आहे. तसेच मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांकडून उद्यान प्रशासन दरमहा ३० रुपये शुल्क घेते या पासच्या दरात ५ पटीने वाढ करून १५० रुपये दरमहा शुल्क घेतले जाणार आहे. गटनेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

गटनेत्यांच्या बैठकीनंतर दरवाढीचा प्रस्ताव पालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत आला असता तेथेही शिवसेना आणि भाजपाच्या सदस्यांची सदस्य संख्या समान असताना आणि विरोधकांची संख्या नगण्य असताना दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. गटनेत्यांच्या तसेच बाजार आणि उद्यान समिती मध्ये दरवाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्या नंतर भाजपाने या दरवाढीला आता विरोध करण्यास सुरुवात केली आहे. पेंग्विन पाहण्याचे शुल्क वाढल्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करून दरवाढीला विरोध दर्शवला आहे. तसेच पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र देऊन राणीबागेत सोयी सुविधा नसताना आणि सध्या कामे पूर्ण झाली नसताना शुल्क वाढवणे योग्य नाही. शुल्क वाढवल्यास पर्यटक आणि नागरिकांवर हा अन्याय होईल असे शेलार यांनी म्हटले आहे. यावर रवी राजा हि भाजपाची दुटप्पी भूमिका आहे. पालिकेत त्यांचे नेते आणि नगरसेवक एक बोलतात आणि पालिकेबाहेर त्यांचे नेते वागले बोलतात. विकास आराखड्यावरून हि सभागृहात भाजपाचे नगरसेवक अभ्यास करण्यासाठी वेळ मागत होते तर त्यांचे गटनेते काही वेगळेच बोलत होते. भाजपामधील नेते आणि नागरसेवक यांच्या बहुरूपी भूमिकेमुळे मुंबईकरांची चांगली करमणूक होत असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे.

दरवाढ -
राणीबाग प्रवेश व पेंग्विन दर्शनासाठी एकत्रित शुल्क -

१२ वर्षांवरील व्यक्तींसाठी : १00 रुपये
तीन ते १२ वयोगटांतील मुलांसाठी : २५ रुपये
कुटुंबासाठी : दोन प्रौढ व तीन ते १२ वर्षांपर्यंतची दोन मुले : १00 रुपये
अतिरिक्त प्रत्येक तीन वर्षांवरील मुलांसाठी २५ रुपये व १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी १00 रुपये.?

शालेय विद्यार्थ्यांसाठी -पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : निशुल्क.
खासगी शाळांतील तीन ते १२ वर्षांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : १५ रुपये.
खासगी शाळांतील १२ वर्षांवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : २५ रुपये.

सकाळी सहा ते आठपर्यंत चालण्यासाठी मासिक १५0 रुपये -
संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत फेरफटका बंद -
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी : निशुल्क
फोटोग्राफी पेंग्विन कक्ष वगळता : १00 रुपये
व्हिडीओ शूटिंग पेंग्विन कक्ष वगळता : ३00 रुपये

परदेशी पर्यटकांसाठी -१२ वर्षांवरील व्यक्तीसाठी : ४00 रुपये.
तीन ते १२ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी : २00 रुपये.

Post Bottom Ad