महापालिकेच्या चिटणीसपदी प्रकाश जेकटे यांची नियुक्ती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिकेच्या चिटणीसपदी प्रकाश जेकटे यांची नियुक्ती

Share This
मुंबई - मुंबई महापालिका चिटणीस नारायण पठाडे हे बुधवारी सेवानवृत झाल्याने या रिक्त पदावर उपचिटणीस प्रकाश जेकटे यांची नियुक्ती झाली आहे. तशी बुधवारी नियुक्तीची ऑर्डरही जेकटे यांना देण्यात आली असून ते १ जूनपासून चिटणीसपदाचा पद्भार स्वीकारणार आहेत. दरम्यान, महापालिका सभागृहात प्रस्ताव मंजूर होईपर्यंत ते प्रभारी चिटणीस म्हणून काम पाहणार आहेत. 


पठाडे ३१ मे रोजी नियमानुसार सेवानवृत्त झाले. त्यांच्या जागी सरचिटणीस विभागातील उपचिटणीस प्रकाश जेकटे व रजनीकांत संख्ये या दोघांच्या नावांची चर्चा होती. मात्र सेवेतील अनुभवानुसार पदोन्नती देण्याचा पालिका अधिनियम आहे. त्यामुळे संख्ये यांच्यापेक्षा दीड वर्षांचा जास्त अनुभव असलेल्या जेकटे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येते. प्रकाश जेकटे यांना महापालिका सभेचा, स्थायी समितीचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्याच तुलनेत संख्येचा अनुभव ही समान आहे. दोन्ही अधिकारी तुल्यबळ असल्याने प्रशासनासमोर पेच होता. मात्र सेवाज्येष्ठता नुसार विचार झाल्याने चिटणीसपदाचे सूत्र जेकटे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले. पालिका सभागृहात प्रस्ताव मंजूर होईपर्यंत जेकटे प्रभारी चिटणीस व त्यानंतर चिटणीस म्हणून त्यांची अधिकृतपणो नियुक्ती होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages