पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करा - अंबीना लांडेंची तंबी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 May 2017

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करा - अंबीना लांडेंची तंबी

मुंबई, ४ मे २०१७ - मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून २८ टक्के नालेसफाई झाल्याचे सांगितले जात असले तरी वस्तुस्तिथी नेमकी उलटी आहे. एल विभागातील काही नाल्यांचे सफाईसाठी कार्यादेश देऊनही कंत्राटदारांकडून अद्यापपर्यंत कामास सुरुवातच झाली नसल्याचा आरोप मनसेचे गटनेते व एल प्रभाग समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांनी केला आहे.  

दिलीप लांडे यांनी एल विभाजगातील नाला क्रमांक १०, ११, १३ तसेच साकीनाका नाला, सफेद पूल नाला, प्रीमियर कॉलनी नाला, विनोबा भावे नगर नाला, संजय नगर नाला, किडणी गावदेवी नाला या नाल्यांचा पाहणी दौरा केला यावेळी अनेक नाले कचऱ्याने तुडुंब भरल्याचे दिसून आले. तर यातील संजय नगर नाला , किरोळ गाव नाला आणि गावदेवी नाल्याचे कामच सुरु नसल्याचे दिसून आले. नाल्याची अवस्था बघितल्यानंतर पावसापूर्वी हे सर्व नाले संपूर्णपणे साफ करून घेण्याचे आदेश लांडे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले. सदर पाहणी दौऱ्यात एल विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबी, कार्यकारी अभियंता पर्जन्य जलवाहिनी विभागाचे दाभोलकर, त्यावेळी सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी, पर्जन्य जल वाहिन्यांचे अधिकारी दाभोळकर, सहाय्यक अभियंता राठोड, मनसेचे कार्यकर्ते व विभागातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post Bottom Ad