![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEioKxtWVJ2xBaWJkmP8_eGQ1qXD0uS1djQZJAMoACFlLT7W5LCx9hHo70XIefDXY4IL0j6leU6QRxvmfGku_kvWm_ISubPVBYc_o1zpNJIBNgJ6aCRj4wUkbyFGjaHXAQXPZaXqJBqb2MY/s640/Min+Deepak+Sawant+Meeting-1.jpg)
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांच्या नूतनीकरणाची व त्यांना आधुनिक अत्यावश्यक उपकरणांची गरज आहे,त्याबरोबरच अनेक रुग्णालयात मनुष्यबळाची कमतरता आहे,अशा रुग्णालयांचा या बैठकीत सावंत यांनी आढावा घेतला. व अशा पात्र रुग्णालयांना महाराष्ट्र शासन राज्य कामगार विमा योजने अंतर्गत हस्तांतरित करून त्यांना सुसज्ज करण्यात येईल असेही सावंत यांनी बैठकीत सांगीतले.याप्रसंगी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्य कामगार विमा योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाण्यात उभारलेल्या रुग्णालयास मंजुरी देऊन राकावी योजनेंतर्गत चालविण्यास घ्यावे याचबरोबर वाळूज,रांजणगाव,पैठण,शेंद्रा या ठिकाणी प्रत्येकी एक राज्य कामगार विमा सेवा दवाखाना सुरु करण्यात यावा असा प्रस्ताव ठेवला.त्यावर सावंत यांनी पात्र रुग्णालयांचे लवकर हस्तांतरण करावे असे निर्देश राज्य कामगार विमा महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.याबरोबरच राज्य कामगार विमा योजने अंतर्गत आवश्यक प्रमाणात मनुष्यबळ उभे केले जाईल त्यासाठीचा आराखडा तत्काळ सादर करावा असे निर्देश सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला राकावी चे सचिव आर के कटारिया,डॉ अनिता सेठी, गणेश जाधव, के व्ही वाहूळ, एस के सिन्हा यांच्यासह राज्य कामगार विमा महामंडळ चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.