मुंबई ( प्रतिनिधी ) – संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात 106 हुतात्म्यांना प्राणाची आहुती दिली, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 29 एप्रिल 1963 रोजी मुंबईतील फोर्ट भागात हुतात्मा चौक बांधण्यात आला, या चौकाचे हुतात्मा स्मारक चौक असे नामकरण करण्याची मागणी मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी एका ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती, त्यांनी मांडलेल्या सूचनेला मुंबई महापालिकेच्या सभागृहाची मंजुरी मिळाली.
फोर्ट विभागातील डॉ. दादासाहेब नौरोजी रोड , महात्मा गांधी रोड आणि वीर नरीमन रोउ यांना जोडणा-या चौकाला हुतात्मा स्मारक चौक असे नाव देण्याची मागणी मनसेचे गटनेते आणि कुलाॅ प्रभाग समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी केली होती मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी ज्या हुतात्मांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे यथोचित र-मारक तयार करून फोर्ट भागात उभारण्यात आले होते सदर हुतात्मा स्मारक तेथे असल्याने या चौकाला हुतात्मा चौक संबोधण्याऐवजी हुतात्मा स्मारक चौक असे नामकरण व्हावे अशी मागणी लांडे यांनी केली होती पालिका सभागृहात सदर ठरावाची सूचना मंजूर झाली त्यामुळे आता यापुढे सदर चौकाला हुतात्मा स्मारक चौक म्हणून संबोधण्यात येणार आहे अशी माहिती लांडे यांनी दिली आहे मुंबईसह महाराष्ट्र आंदोलनात आपल्या प्राणांची आहुती देणा-या हुतात्मांच्या र-मरनाथॅ दक्षिण मुंबईतील फोर्ट विभागातील चौकाचे हुतात्मा चौक नामकरण 29 एप्रिल 1963 रोजी करण्यात आले होते असेही लांडे यांनी सांगितले