मुंबई ( प्रतिनिधी ) – जगप्रसिद्ध असलेला अभिनेता सलमान खानच्या घरासमोरील सार्वजनिक शौचालयाचे प्रकरण चांगलेच गाजत आहे सोमवारी पालिका मुख्यालयात महापौर दालनात झालेल्या बैठकीत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या शौचालयाचे बांधकाम हे नियमानुसारच करा. तेथे कोणतेही बांधकाम अनधिकृतरित्या होणार नाही, याची काळजी घ्या पालिका स्थानिक विभाग अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आदेश महापौरांनी वांद्रे येथील एच पश्चिम विभाग अधिका-यांना दिले. या शौचालयाचे बांधकाम सुरु करण्याआधी पालिका प्रशासनाने स्थानिक रहिवाशांना पूर्वनोटीस दिलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक शौचालय बांधण्यात आले मात्र शौचालयाचा विषय केव्हा गाजला नाही परंतु अभिनेता सलमान खान च्या येथील शौचालयाचा सध्या विषय चांगलाच गाजत आहे मुंबईत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी शौचालय बांधण्यापूर्वी त्याठिकाणी शौचालय बांधण्यात येणार आहे, अशी नोटीस लावणे नियमानुसार बंधनकारक आहे त्या नोटीशीनंतर स्थानिक रहिवासी आणि इतर लोकांना त्यांच्या हरकती व सूचना मांडण्याचा अधिकार असतो. या हरकती सूचनांवर निर्णय झाल्यानंतरच पालिकेला शौचालय उभारता येते. मात्र, वांद्र्यातील ‘एच पश्चिम’विभागाने सलमान खानच्या घरासमोर शौचालय उभारण्यापूर्वी अशी कोणतीच नोटीस प्रशासनाने दिलेली नाही, असे स्थानिक विभाग अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे, असे महापौरांनी सांगितले आहे सेलिब्रिटीज आणि रहिवासी यांची महापौर दालनात बैठक झाली त्यावेळी महापौरांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर पालिकेच्या स्थानिक वॉर्ड अधिका-यांना यासंबंधी संपर्क साधून माहिती घेतली ‘हे शौचालय बांधण्याआधी पालिकेने कोणाकडूनही हरकती व सूचना मागवल्या नाहीत आणि तेथे फक्त भेट दिली होती, असे त्यांनी मान्य केले, अशी माहिती महापौरांनी दिली. यामुळे तेथे नियमानुसारच काम झाले पाहिजे, बेकायदा आणि चुकीचे होता कामा नये, असे आदेश वॉर्ड अधिका-यांना महापौरांनी दिले प्रसिद्ध सलीम खान आणि प्रख्यात अभिनेत्री वहिदा रहेमान हे सेलिब्रिटीज् पालिकेच्या एम पश्चिम विभागातील वांद्रे येथे राहात असून, त्यांच्या घरासमोरील जागेत होत असलेल्या सार्वजनिक शौचालय उभारणीला विरोध केला आहे. त्यांच्या या विरोधाला स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला असताना, या वादात राजकीय पक्षांनीही हस्तक्षेप केल्याने या स्वच्छतागृहाचे काम रखडले आहे. यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने सलीम खान आणि वहिदा रहेमान सोमवारी सकाळी ११ वाजता पालिका मुख्यालयात महापौरांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी स्थानिक रहिवासीदेखील उपस्थित होते. सलीम खान यांचे बांद्रा पश्चिमेला गॅलक्सी हे आठ मजली अपार्टमेंट आहे. ‘सी फेस व्ह्यू’ असलेल्या इमारतीत सलमान आपल्या बंधूंसह राहत आहे. सध्या हे ठिकाण सध्या ‘टुरिस्ट स्पॉट’ झाले आहे. सकाळ-सायंकाळी ‘प्रोमोनेड’वर गर्दी होते. त्याची बांद्रा बँडस्टँड रहिवासी संघाकडून देखभाल केली जाते. या प्रोमोनेडला आठवड्याला सुमारे तीन लाख लोक भेटी देत असताना येथे एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नव्हते. त्यामुळे मुंबई पालिकेने येथे ‘पोर्टेबल टॉयलेट’ उभारण्याचे ठरवले आहे. यासाठी खड्डेही खोदण्यात आले. तीन व्यक्ती वापर करू शकतील असा पोर्टेबल टॉयलेटचा पायाही बसवण्यात आला. मात्र त्याला विरोध करुन सलीम खान आणि वहिदा रहेमान यांनी या शौचालयाची जागा बदलावी, अशी मागणी करणारा अर्ज मुंबईच्या महापौरांकडे केला आहे त्यामुळे आता पालिका काय निर्णय़ घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे हा वाद चिघळण्याची शक्यता वतॅवली जात आहे