
मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईच्या दादर चैत्यभूमी परिसरातील इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून रिपब्लिकन सेनेने इंदू मिलवर कब्जा केला होता. यावेळी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी जनतेने भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्यांची स्थापना केली होती. एमएमआरडीएच्या विनंती नुसार ऐतिहासिक लढयावेळी स्थापन करण्यात आलेल्या महामानवांच्या मुर्त्या भंते धम्मरक्षित, सरसेनानी आनंदराज आंबेडकर, मनीषाताई आंबेडकर, दर्शनाताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत २ मे रोजी सुरक्षित जागी स्थलांतरीत करण्यात आल्या. सादर कार्यक्रमा प्रसंगी रिपब्लिकन सेनेच्या वतीने इंदू मिलमधील ऐतिहासिक लढ्याला उजाळा देण्यात आला. मुंबई अध्यक्ष कामगार नेते रमेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश शिनंगारे यांनी केले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे अँड संघराज रूपवते, संजीव बावधनकर, भाई सावंत, संजय देखने, खाजामियाँ पटेल, आशीष गाडे, भीमराज जगताप, कवी बबन सरवदे, लक्ष्मि गोवेकर, एमएमआरडीएचे अधिकारी, भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, समता सैनिक दल, व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 