मुंबई, दि. 17 : कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी त्याला जोडव्यवसायाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात कृषीपर्यटनाला मोठा वाव असून त्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण तयार केले आहे.हे धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
दहाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आलेल्याराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय(पदुम) मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक विजयवाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, ॲग्री टुरीजमचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग तावरे, गोवर्धनइको व्हीलेजचे निरज कपूर, कृषी पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेले भगवान तावरे, माधव सानप, अभिजित फाळके आदीमान्यवर उपस्थित होते. एमटीडीसी आणि ॲग्री टुरीजम यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेहोते.
मंत्री रावल म्हणाले की, आपले राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. याशिवाय राज्याला वेगळी अशी ऐतिहासिक,सांस्कृतिक ओळख आहे. राज्यात शहरीकरण हे साधारण 50 टक्क्यांपर्यत वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीणजीवनशैली, कृषी संस्कृती यांचे आकर्षण वाढले आहे. या संधीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन व्यवसायावर लक्षकेंद्रीत करणे गरजेचे आहे. राज्य शासनानेही कृषी पर्यटनाला चालना देण्याचे ठरविले असून त्यादृष्टीने समग्र असे कृषीपर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे. येत्या 23 मे रोजी यासंदर्भात वित्त आणि उर्जा मंत्र्यांसमवेत बैठक आयोजितकरण्यात आली आहे. धोरणाचा मसुदा तयार झाला असून त्यास मान्यता घेऊन लवकरच हे धोरण जाहीर करण्यात येईल. कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने अनेक तरतुदी या धोरणात असतील, असे त्यांनी सांगितले.
कृषी पर्यटनासाठी एमटीडीसीत स्वतंत्र अधिकारीकृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी व यासंदर्भातील योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकासमहामंडळात एक स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्यात येईल, असेही रावल यांनी यावेळी जाहीर केले. राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांचे प्रमाण सर्वाधिक असून देशाच्या विविध भागातूनही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणातपर्यटक येतात. एमटीडीसीमार्फत सुरु करण्यात आलेल्या महाभ्रमण योजनेतून अमरावती जिल्ह्यातील डीअर पार्क,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रोकोडाईल पार्क यांसारखे उपक्रम यशस्वी होत आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पदुम मंत्री जानकर यावेळी म्हणाले की, कृषी विकासाला चालना देण्यासाठी शासनाने पदूम विभागावारविशेष लक्ष केंद्रीत केले आहे. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी या क्षेत्रातही पदूम विभाग महत्वपूर्ण योगदान देईल.पर्यटन विभागामार्फत लवकरच जाहीर होणाऱ्या कृषी पर्यटन धोरणात पशुसंवर्धन, दुग्धविकास आणिमत्स्यव्यवसायासंदर्भातील तरतुदींचाही समावेश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
विविध पुरस्कारांचे वितरण -दरम्यान, कृषी पर्यटनात विशेष कार्य करणाऱ्या विविध संस्था, व्यक्ती यांचा या परिषदेच्या समारोप समारंभातविविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पर्यटन मंत्री रावल व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. चंद्रपूर येथील ‘एक मोकळा श्वास ॲग्रीटुरीजम सेंटर’चे सुहास अशेकर, थेऊर (जि. पुणे) येथीलकल्पतरु ॲग्रीटुरीजम सेंटरचे प्रतिक कंद, मोराची चिंचोली (जि. अहमदनगर) येथील आनंद कृषी पर्यटन केंद्राचे आनंदरावथोपटे, औरंगाबाद येथील सृष्टी ॲग्रीटुरीजम सेंटरचे किरण सानप व प्रतिभा सानप, अनंतपूर (आंध्रप्रदेश) येथील अदरनाॲग्रीटुरीजम सेंटरचे एन. रामकृष्णा, पालघर येथील गोवर्धन इको व्हीलेजचे नीरज कपूर यांना यावेळी पुरस्कारांचे वितरणकरण्यात आले.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, शेती व्यवसायाला उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधणे गरजेचे आहेत. यादृष्टीने कृषी पर्यटन हा चांगला पर्याय ठरु शकतो. त्याला चालना देण्यासाठी कृषी विभागामार्फत व्यापक प्रयत्न करण्यातयेतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.