डॉ. नितीन करमळकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. नितीन करमळकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड

Share This

मुंबई, दि. 17 : डॉ. नितीन रघुनाथ करमळकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. नितीन करमळकर सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण विज्ञान विभागात प्राध्यापक (भूगर्भशास्त्र) तसेच विभागप्रमुख या पदावर कार्यरत आहेत.

राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी बुधवारी (दिनांक १७) डॉ करमळकर यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. करमळकर यांची नियुक्ती पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.

मावळते कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ दिनांक १५ मे रोजी संपल्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचेकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

डॉ. नितीन करमळकर (जन्म ११ जानेवारी १९६२) यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून बी. एससी. तसेच पुणे विद्यापीठातून एम. एससी. व पीएच. डी. प्राप्त केली असून उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन, प्रशासन तसेच संशोधनाचा त्यांना व्यापक अनुभव आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष तसेच महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.

जयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे (Malaviya National Institute of Technology, Jaipur)संचालक प्रो. उदयकुमार यारगट्टी तसेच सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे समितीचे अन्य सदस्य होते.

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मंगळवारी प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. करमळकर यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages