मुंबईत स्वाईन फ्ल्यूचा दुसरा बळी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 May 2017

मुंबईत स्वाईन फ्ल्यूचा दुसरा बळी

मुंबई - मुंबईतून स्वाईन फ्लू हद्दपार केला असा महापालिकेकडून दावा केला जात असतानाच सन 2017 मध्ये स्वाईनचे 32 रुग्ण आढळले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत महापालिकेकडून दुर्लक्षित राहिलेल्या स्वाईन फ्लूने अचानक डोके वर काढल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. 1 जानेवारी ते 30 एप्रिलपर्यंत राज्यभरात 500 हून अधिक स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडले असून 196 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू ने मृत्युमुखी पडण्याऱ्यांची संख्या पुणे, नागपूरमध्ये सर्वांधिक आहे.


मुंबईतील वरळी येथील आंबेडकर नगर परिसरात राहणार्‍या दीड वर्षांच्या मुलाचा 28 एप्रिलला स्वाईन फ्लूची लागण होऊन मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना 12 मे रोजी कुर्ल्यातील 72 वर्षीय वृद्ध महिलेला या स्वाईन फ्लूमुळे जीव गमवावा लागल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे मिळाली आहे. संबंधित महिलेला बर्‍याच दिवसांपासून ताप व उलट्या होत होत्या. या महिलेला उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा त्रास असल्याने त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. 12 मे रोजी कुर्ल्यातील कोहिनूर रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. पण प्रकृती सुधारत नसल्याने उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला. एच१एन१ संसर्गाच्या अहवालाची प्रतिक्षा केली जात होती. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तिचा स्वाईन फ्ल्यूनेच मृत्यू झाल्याचे सिद्ध झाले आहे.

मुंबईत स्वाईन फ्लूचे 11 नवे रुग्ण - 
2015 मध्ये स्वाईन फ्लूचे 3,029 रुग्ण आढळून आले होते. यापैकी 30 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. 2016 मध्ये स्वाईन फ्लूचे केवळ तीनच रुग्ण सापडले होते. 2017 या वर्षी जानेवारीच्या सुरूवातीपासून स्वाईन फ्लूनेे डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. 2017 मुंंबईत आता 32 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. यात जानेवारीत 2 व फेब्रुवारीत 2 , मार्चमध्ये 5, एप्रिलमध्ये 12 तर मे मध्ये आतापर्यंत 11 रुग्णांची नोंद झाली आहे.

Post Bottom Ad