मुंबई ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या मुंबई पालिका प्रशासनाने मुंबईतील नालेसफाईचे काम सुरू केले आहे येत्या पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाईची कामे एकदम धिम्या गतीने सुरू असताना काही ठिकाणी नालेसफाई झालीच नसल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला असताना पालिका प्रशासनाने चक्क नालेसफाईची कामे वेगाने सुरू असून आतापर्यंत 48 टक्के नालेसफाई झाल्य़ाचा दावा केला आहे. त्यामुळे पालिकेचा हा दावा किती सार्थक ठरणार हे पावसाळ्यात समजणार आहे.
गेल्या वर्षी पालिकेत नालेसफाई घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यात दोषी असणा-या अधिकारी, कंत्राटदरांना तुरुंगात जावे लागले. या घोटाळ्यानंतर पालिकेला नालेसफाई कामासाठी कंत्राटदारांचा मिळेना अशी स्थिती आहे. सहावेळा पालिकेला टेंडर काढावे लागले अशी कबुली मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समिती सभेत प्रशासनाने दिली होती. त्यामुळे कंत्राटदार मिळत नसल्याने कामे रखडली असल्याचे स्पष्ट झाले. या सभेत नगरसेवकांनी विभागात अद्याप नाले सफाई झालेली नाही. फक्त 10 टक्केच नालेसफाई झाली, त्यामुळे कमी वेळात नालेसफाई कशी होणार असा संतापही व्यक्त केला होता. मात्र नालेसफाईची कामे वेगात सुरु असून मे २०१७ च्या पहिल्या आठवड्यात मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामे ४८.२६ टक्के एवढी पूर्ण झाली आहेत. गेल्यावर्षी हेच प्रमाण २२.१२ टक्के एवढे होते. छोट्या नाल्यांचीही कामे विभाग स्तरावर ठरलेल्या वेळापत्रकानुसार व्यवस्थितपणे सुरु आहेत. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी ठरल्यानुसार पूर्ण होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.
पालिका क्षेत्रातील मोठ्या नाल्यांच्या सफाईद्वारे १ लाख ७६ हजार २०२ मेट्रीक टन एवढा गाळ येत्या पावसाळ्यापूर्वी हटविणे अपेक्षित आहे. यापैकी ६ मे २०१७ पर्यंत ८५ हजार २८ मेट्रीक टन गाळ काढून व वाहून नेण्यात आला आहे. त्यामुळे ६ मे २०१७ पर्यंत नालेसफाईची कामे ४८.२६ टक्के एवढी झाली आहेत. गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी एकूण १ लाख ७२ हजार ९८० मेट्रीक टन एवढा गाळ काढून व वाहून न्यावयाचा होता. यापैकी गेल्यावर्षी 'मे' च्या पहिल्या आठवड्यापर्यंत मोठ्या नाल्यांमधून ३८ हजार २६२.३५ मेट्रीक टन एवढा गाळ काढून व वाहून नेण्यात आला होता; म्हणजेच गेल्यावर्षी हे प्रमाण २२.१२ टक्के एवढे होते अशी माहिती महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे प्रभारी संचालक व पर्जन्यजलवाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता लक्ष्मण व्हटकर यांनी दिली.
मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील शहर विभागातील मोठ्या नाल्यांमधून ४ हजार २८७ मेट्रीक टन (२५.२४ टक्के) एवढा गाळ काढून व वाहून नेण्यात आला आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण १४.९२ टक्के एवढे होते. यावर्षी पश्चिम उपनगरांमध्ये ४९ हजार ८२२ मेट्रीक टन (५०.९६ टक्के); तर पूर्व उपनगरांमध्ये ३० हजार ९१९ मेट्रीक टन (५०.३१ टक्के) एवढा गाळ काढून व वाहून नेण्यात आला आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण पश्चिम उपनगरांमध्ये २९.५९ टक्के तर पूर्व उपगनरांमध्ये १३.८२ टक्के एवढे होते. तसेच मिठी नदीमधील गाळ काढून व वाहून नेण्याचे कामही प्रगती पथावर असून ६ मे २०१७ पर्यंत ४१.१२ टक्के काम पूर्ण झाले आहे, असेही व्हटकर यांनी सांगितले.
लहान नाल्यांच्या व रस्त्यालगतच्या वाहिन्यांच्या सफाईची कामे विभाग स्तरावर केली जात असून ती स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केली जात आहेत. छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी ३ लाख ७० हजार ९५४ मनुष्य दिवसांचा तर रस्त्यालगतच्या वाहिन्यांच्या सफाईसाठी २ लाख ४१ हजार ५४६ मनुष्य दिवसांचा वापर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही कामे करताना गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यदिवसांची उपलब्धता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. ही कामेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील या गतीने प्रगतीपथावर आहेत, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
लहान नाल्यांच्या व रस्त्यालगतच्या वाहिन्यांच्या सफाईची कामे विभाग स्तरावर केली जात असून ती स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केली जात आहेत. छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी ३ लाख ७० हजार ९५४ मनुष्य दिवसांचा तर रस्त्यालगतच्या वाहिन्यांच्या सफाईसाठी २ लाख ४१ हजार ५४६ मनुष्य दिवसांचा वापर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही कामे करताना गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यदिवसांची उपलब्धता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. ही कामेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील या गतीने प्रगतीपथावर आहेत, असेही प्रशासनाने म्हटले आहे.