मुंबईत नालेसफाईच्या नावाने हातसफाई सुरु - संजय निरुपम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत नालेसफाईच्या नावाने हातसफाई सुरु - संजय निरुपम

Share This

पावसाळयात मुंबई डुबणार -
मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून शिवसेना नेते युरोपमध्ये -
मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईत दोन वर्षांपूर्वी झालेल्या नालेसफाईच्या घोटाळ्यानंतर यावर्षी आणखी एक नालेसफाई घोटाळा सुरु आहे. या घोटाळ्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने मुंबईत नसलेसफाईच्या नावाने हातसफाई सुरु आहे. नालेसाफाईसाठी खर्च केले जाणारे १५० कोटी रुपये वाया जात असल्याने नालेसफाईच्या नावाने सुरु असलेल्या हातसफाईची पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी करावी अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. तसेच यावेळी नालेसफाई योग्य रित्या झाली नसल्याने पावसाळयात मुंबई डुबणार असा दावा निरुपम यांनी केला आहे.

मुंबईमधील नालेसफाई ८६ टक्के झाल्याचा दावा पालिका प्राशासनाकडून केला जात असताना आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा, नगरसेवक विठ्ठल लोकरे, सुफियान वणू, सुप्रिया मोरे, पुष्पा कोळी इत्यादी नगरसेवक व कार्यकर्त्यांसह मुंबईतील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह वडाळा येथील कोरबा मिठागर नाला व गोवंडी येथील रफिक नगर नाल्याची पाहणी केली असता दोन्ही नाल्याची सफाई झाली नसल्याने मुंबईतील नालेसफाई २५ टक्केही झाली नसल्याचा आरोप निरुपम यांनी केला. नालेसफाईची डेडलाईन दोन दिवसणे संपणार असल्याने दोन दिवसात कोणताही नवा चमत्कार होणार नसल्याचे निरुपम म्हणाले.

महापालिकेने नालेसफाईसाठी कंत्राटदार मिळत नसल्याने २५ ते ४३ टक्के जास्त दराने नालेसफाईची कामे दिली. मोठ्या नाल्यांसाठी १६०९ रुपये प्रति मॅट्रिक टन दार देण्यात आला. तर लहान नाल्यांची कामे एनजीओ कडून करून घेतली जात आहेत. नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदारांना कचरा टाकण्यासाठी स्वतःच डम्पिंगची व्यवस्था करण्यास सांगण्यात आल्याने नक्की किती गाळ आणि कुठे टाकला जात आहे यावर पालिकेचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे निरुपम म्हणाले.मुंबईबाहेर ज्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व प्रदूषण विभागाने नालेसफाईच्या गाळ टाकण्यासाठी परवानगी दिली असल्यास ती परवानगी का दाखवली जात नाही असा प्रश्न करत हा आणखी एक नालेसफाईच्या घोटाळा सुरु असल्याने या घोटाळ्याची चोकशी करावी अशी मागणी निरुपम यांनी केली.

मेट्रोच्या कामामुळे पश्चिम मुंबई तुंबणार -
मुंबईत पश्चिम उपनगरात अंधेरी ते दहिसरच्या रस्त्यावर मेट्रोच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्यावर खोद काम केल्याने पावसाळ्यात पाऊस पडल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचणार आहे. पाणी रस्त्यावर साचल्याने पश्चिम उपनगरातील रहदारीला व स्थानिक नागरिकांना याचा त्रास होणार आहे. यामुळे या पावसाळयात पश्चिम उपनगराचा परिसर पाण्यात डुबणार आहे असा दावा बनिरुपम यांनी केला.

डिझास्टर कंट्रोलमध्ये जाण्यापासून काँग्रेसवाल्याना रोखले -
मुंबईमध्ये आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागातून त्यावर नियंत्रण मिळवण्यात येते. पावसाळा तोंडावर असल्याने आणि नालेसफाईच्या गाड्यांवर व्हीटीएस लावले असून त्यावर या आपतकालीन व्यवस्थापन विभागातून करण्यात येते असे सांगण्यात आले. म्हणून आपत्कालीन व्यवस्थापन विभागात पाहणी करण्यासाठी माझ्यासह काँग्रेसचे नगरसेवक गेले असता आम्हाला या विभागात प्रवेश नाकारण्यात आला. पालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागात आम्हाला प्रवेश नाकारून नालेसफाईचा घोटाळा लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागात शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांना प्रवेश मिळतो मग काँग्रेसच्या नेत्यांना का प्रवेश मिळत नाही असा प्रश्न संजय निरुपम यांनी केला.

मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून शिवसेना नेते युरोपमध्ये -
मुंबई महापालिकेत गेले २० वर्षे शिवसेना भाजपा दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत सहभागी होते. यावर्षी महापालिका निवडणुकी दरम्यान या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या २० वर्षाच्या काळात आमची मुंबई, मी मुंबईकर नावाने अनेक घोषणा देण्यात आल्या पालिकेचे बजेट ३७ हजार करोड पर्यंन्त गेले तरीही इतक्या वर्षात सत्ताधाऱ्यांना नालेसफाई योग्य रित्या करून घेता आलेली नाही. सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाकडे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. मुंबईमधील नालेसफाई होत नसताना मुंबईकर नागरिकांना वाऱ्यावर सोडून शिवसेनेचे नेते युरोपमध्ये फिरत आहेत.
संजय निरुपम - अध्यक्ष काँग्रेस, मुंबई

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages