डॉ. सुरेंद्र कुमार बागडे यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. सुरेंद्र कुमार बागडे यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला

Share This

मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांची नियुक्ती ककरण्यात आली आहे. बागडे यांनी शुक्रवारी बेस्ट उपक्रमाचे मावळते महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांच्‍याकडून बेस्ट उपक्रमाचा महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला. बागडे यांची नेमणूक बेस्ट महाव्यवस्थापक पदावर करण्यात आली असल्याने तोटयात असलेल्या बेस्टला ते तोट्यातून बाहेर काढतात का ? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 


गेल्या अनेक वर्षापासून तोटयात चालत असताना सुद्धा मुंबईकरांना कमी दरात सेवा पुरवत आहे. बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बेस्टने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले असतानाच बेस्ट महाव्यवस्थापकपदी नव्याने डॉ सुरेंद्रकुमार बागडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. बागडे यांनी विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी प्राप्त केली असून औद्योगिक अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर पदविका देखील संपादन केली आहे त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कारनेगी मेल्लन विद्यापीठातून डाॅक्टरची पदवी मिळवली आहे. बागडे हे 1993 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. सर्वप्रथम त्यांची नियुक्ती गडचिरोली येथे सहायक आयुक्त म्हणून झाली आहे. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर ते उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी म्हणून कार्यरत होते. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages